शाहरुख खान, सलमान खानसाठी विनातिकिट 25 तास अन्न पाण्याशिवाय प्रवास, 14 वर्षाच्या मुलगा भूकेने व्याकूळ, बंगल्याबाहेर पोहोचलाच..
सलमान खान शाहरुख खान किंवा इतर कोणत्याही बॉलिवूड कलाकाराला भेटण्याचे स्वप्न जवळपास सर्वांचेच असते. मात्र, नुकताच धक्कादायक अशी घटना उघडकीस आलीये. आपल्या आवडत्या स्टारला भेटण्यासाठी एका 14 वर्षीय मुलाने हैराण करणारे पाऊस उचलले आहे.

सलमान खान, शाहरुख खान यांना भेटणे म्हणजे अनेकांचे स्वप्न असते. आपल्या आवडत्या अभिनेत्याला भेटण्यासाठी लोक जीवाचे रान करतात. यासाठी काहीही करण्याची तयारी देखील त्यांची असते. बऱ्याच लोकांना वाटते की, आपण मुंबईला गेलो म्हणजे मोठ्या बॉलिवूड कलाकारांना भेटू शकतो. आता नुकताच अंगावर काटा आणणारी घटना पुढे आली. कोरोनामध्ये आई वडिलांचे छत्र हरवले. एका कुटुंबियांनी मुलगा म्हणून स्वीकार केला. मात्र, नियतीने काही वेगळेच लिहू ठेवले. ज्या घरात मुलगा म्हणून गेला त्या घरातील मुलांनी प्रचंड त्रास देण्यास सुरूवात केली. शेवटी शाहरुख खानची जिद्द डोळ्यासमोर ठेवून शाहरुख खान आणि सलमान खानला बघण्यासाठी 14 वर्षीय मुलाने थेट पंजाब मिल एक्सप्रेस गाठली. खिशात एक रूपयाही नाही आणि 25 तास उपाशीपोटी प्रवास करून हा मुलगा दादर स्टेशनला पोहोचला.
25 तासांपेक्षाही अधिक काळ पोटात अन्नाचा कणही नसताना दादरला उतरल्यानंतर लोकांना विचारल्यानंतर त्याला समजले की, सलमान खान आणि शाहरुख खान वांद्रा भागात राहतात. त्यानंतर तो थेट सलमान खान आणि शाहरुख खानच्या बंगल्याबाहेर पोहोचला. काही तास वाट पाहूनही दोघांनाही पाहता आले नाही आणि तो प्रचंड निराश झाला. शिवाय पोटात अन्नाचा कणही नव्हता. शाहरुख खानच्या घराबाहेरही तो अनेक तास होता.
शेवटी शाहरुख खान आणि सलमान खान दिसले नसल्याने त्याने पुन्हा दादर स्टेशन गाठले. मुंबईनंतर त्याने बेंगलाैरला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, दादर स्टेशनवर तो भूकेने व्याकूळ झाला. नियतीने त्याच्याविरोधात मोठे षडयंत्र रचले. मात्र, त्याने हार मानली नाही. खिशात पैसे नाही, पोटात अन्न नाही अशाच अवस्थेत तो दादरच्या फलाट क्रमांक 12 वर फिरत होता. त्याच्यावर नजर पडली चाईल्ड हेल्पलाईनच्या कर्मचाऱ्यांची.
14 वर्षीय मुलाला पाहून चाईल्ड हेल्पलाईन कर्मचाऱ्यांना संशय आला. यादरम्यान त्यांनी मुलाची चाैकशी केली. विश्वास बसल्यानंतर मुलाने आपल्यासोबत काय काय घडले हे सांगितले. मुलाचे बोलणे ऐकून चाईल्ड हेल्पलाईन कर्मचाऱ्यांना देखील धक्का बसला. आता या मुलाला बालगृह पाठवण्यात आले.
