‘माणूस ते संत’ दैवी प्रवास, पुन्हा एकदा अनुभवता येणारा ‘तुकारामां’ची गाथा!

फक्त मराठी वाहिनीवर येत्या रविवारी बहुचर्चित आणि प्रत्येकाच्या हृदयात वसलेले महाराष्ट्राचे लाडके संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावर आधारित 'तुकाराम' या भव्य चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे.

'माणूस ते संत' दैवी प्रवास, पुन्हा एकदा अनुभवता येणारा ‘तुकारामां’ची गाथा!
तुकाराम

मुंबई : फक्त मराठी वाहिनीवर येत्या रविवारी बहुचर्चित आणि प्रत्येकाच्या हृदयात वसलेले महाराष्ट्राचे लाडके संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘तुकाराम’ या भव्य चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे. या चित्रपटातून तुकारामांचा ‘माणूस ते संत’ असा प्रवास पहायला मिळणार आहे. तुकारामांच्या जीवनातील अनेक पदर चित्रपटातून उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. रविवारी सकाळी 11:00 वाजता आणि संध्याकाळी 6:30 वाजता, फक्त मराठी प्रिमीयरमध्ये या चित्रपटातून पुन्हा एकदा ‘संत तुकारामां’ची भेट घडणार आहे (Tukaram movie primer show on fakt Marathi channel).

दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी पुन्हा एकदा जगाला संत तुकाराम नव्याने समजावेत या भावनेने ‘तुकाराम’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आणि हीच भावना फक्त मराठीची असल्याचे आम्ही या चित्रपटाचा प्रीमियर रविवारी करण्याचे ठरवले, असे फक्त मराठी वाहिनीचे बिझनेस हेड श्याम मळेकरांनी सांगितले.

अनुभवता येणार तुकारामांची गाथा

व्ही. शांताराम यांनी 85 वर्षांपूर्वी ‘संत तुकाराम’ हा चित्रपट पडद्यावर आणला होता. 1936मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानंतर मात्र तुकारामांच्या आयुष्यावर काहीही निर्मिती झाली नाही. मी जेव्हा या माणूसपण जागवणाऱ्या महान संताच्या आयुष्यावर चित्रपट काढायचे ठरवले, तेव्हा मनात एक धागा पक्का होता की, केवळ जुना काळ उभा करण्यापेक्षा पिरियड सिनेमा म्हणून तो काळ सजवण्यापेक्षा त्या काळातील कालसापेक्ष असे घटक, चिरंतन राहिलेले संस्कार आणि आधुनिक युगातल्या म्हणवणाऱ्यांनी तुकारामांचा लावलेला अन्वयार्थदेखील चित्रपटात दाखवायचा. आधुनिक पिढीसमोर संत तुकाराम उभे करताना मला ते केवळ अभंगांपुरते नको होते, असे तुकाराम या चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी सांगतात (Tukaram movie primer show on fakt Marathi channel).

महाराष्ट्रासह जगभरात संत तुकाराम महाराजांच्या विचारांनी प्रभावीत मोठा समुदाय आहे. मराठी समजणाऱ्यांना ‘तुकाराम’ माहित नाही अशी व्यक्ती सापडणं दुर्मिळ आहे. त्यामुळे हा चित्रपट मराठीसह अमराठी प्रेक्षकांनाही समजेल असा, तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचा बनवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, असे निर्माते संजय छाब्रिया यांचे म्हणणे आहे.

जितेंद्र जोशीने साकारले ‘तुकाराम’

अभिनेते जितेंद्र जोशी यांनी तुकारामांची अप्रतिम भुमिका साकारली आहे. तुकारामांच्या पत्नीची भूमिका राधिका आपटे यांनी केली असून बालकलाकार पद्मनाभ गायकवाड, वीणा जामकर, शरद पोंक्षे, प्रतीक्षा लोणकर, यतीन कार्येकर यांच्याही यात महत्वाच्या भूमिका आहेत. अजित दळवी, प्रशांत दळवी लिखित ‘तुकाराम’ चित्रपटाचे जेष्ठ संगीतकार अशोक पत्की व अवधूत गुप्ते हे चित्रपटाचे संगीतकार असून, काही गाणी कवी दासू वैद्य यांनी लिहिली आहेत. कलादिग्दर्शक एकनाथ कदम यांनी या चित्रपटात 1609 ते 1650चा कालावधी उभा केला आहे.

(Tukaram movie primer show on fakt Marathi channel)

हेही वाचा :

हिप्नोटाईज करुन 50 हजार लंपास, अभिनेता योगेश सोहोनीला लुटणारा दोन दिवसात गजाआड

आधी मोदी सरकारवर थेट टीका, आता अनुपम खेर यांनी घेतला युटर्न, म्हणाले…..