‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्याला बेदम मारहाण… रक्तबंबाळ अवस्थतील धक्कादायक व्हिडीओ समोर…
Anuj Sachdeva : 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्याला एक व्यक्ती मारताना दिसत आहे... सध्या अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्याला एक व्यक्ती बेदम मारहाण करताना दिसत आहे… अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, अनूज सचदेवा आहे… खुद्द अनूज याने व्हिडीओ पोस्ट करत मारणार करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. अनूज हा मुंबईतील गोरेगाव याठिकाणी असणाऱ्या एका सोसायटीमध्ये राहतो. सोसायटीमधीलच एका व्यक्तीने त्याला मारहाण केली आहे. अनुज याने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती त्याला मारताना दिसत आहे… अनुज याने काही कारण नसताना त्याच्या श्वानाला माझ्यावर सोडलं… असा आरोप समोरच्या व्यक्तीने केला आहे…
‘कुत्ते से कटवाएगा?’ असं देखील बोलत असताना माणूस व्हिडीओमध्ये दिसत आहे… शिवाय त्याने अभिनेत्यासाठी अर्वाच्य भाषाही वापरली. एवढंच नाही तर, सोसायटीच्या आवारात असलेली काढी उचलवून त्याने अनुजवर हल्ला केला. माणसाने मारहाण केल्यानंतर ‘माझ्या डोक्यातून रक्त येत आहे…’ असं देखील अनूज म्हणाला. सध्या अनुज याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
व्हिडीओ पोस्ट करत अनुज म्हणाला, ‘संबंधीत व्यक्ती मला किंवा माझ्या मालमत्तेवा काही नुकसान पोहाचवण्यापूर्वीच मी पुरुवा पोस्ट करत आहे… सोसायटीमध्ये चुकीच्या ठिकाणी गाडी पार्क केल्याबद्दल त्याने माझ्या कुत्र्याला आणि मला मारण्याचा प्रयत्न केला. ही व्यक्ती 602, ए विंग, हार्मनी मॉल रेसिडेन्सी, गोरेगाव पश्चिम येथे राहते… जी व्यक्ती यावर कारवाई करु शकते. त्या व्यक्तीपर्यंत हे जाऊद्या… माझ्या डोक्यातून रक्त वाहत आहे…’ असं देखील अनुज पोस्टमध्ये म्हणाला.
व्हिडिओ शेअर केल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी त्यावर आक्षेप घेतला आहे आणि यावर कठोर कारवाई करावी असं म्हटलं आहे. अनुजबद्दल सांगायचं झालं तर, त्याने ये रिश्ता क्या कहलाता है, स्वरागिनी, साथ निभाना साथिया आणि नच बलिए यासह अनेक मोठ्या टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. अभिनेता सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतो.
