AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाईव्ह शोमध्ये महिलेसोबत लिपलॉक, स्पष्टीकरण देत उदित नारायण म्हणाले…

Udit Narayan: लाईव्ह शोमध्ये उदित नारायण यांनी महिलेसोबत केलं लिपलॉक, नटेकऱ्यांनी संताप व्यक्त करताच स्पष्टीकरण देत उदित नारायण म्हणाले..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त उदित नारायण यांच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा...

लाईव्ह शोमध्ये महिलेसोबत लिपलॉक, स्पष्टीकरण देत उदित नारायण म्हणाले...
Updated on: Feb 01, 2025 | 2:37 PM
Share

हिंदी सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक उदित नारायण यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आतापर्यंत त्यांनी बॉलिवूडसाठी अनेक गाणी गायली आहे. उदित नारायण यांनी सलमान खान पासून शाहरुख खान पर्यंत अनेक कलाकारांसाठी गाणी गायली आहेत. पण आता उदित नारायण एका व्हिडीओमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सोशल मीडियावर उदित नारायण यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये उदित नारायण एका महिला चाहतीच्या ओठांना किस करताना दिसत आहेत.

व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी संताप व्यक्त केला. लाईव्ह शो सुरु असताना उदित नारायण यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी आलेल्या महिलेच्या ओठांवर उदित नारायण यांनी किस केलं. शोमधील अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

उदित नारायण यांचं स्पष्टीकरण

सोशल मीडिया यूजर्स या व्हिडिओवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. उदित नारायणच्या या कृतीवर काहींचा विश्वास बसत नाही. त्याच वेळी, काही वापरकर्ते या कृत्याबद्दल गायकाला फटकारताना दिसत आहेत.सोशल मीडियावर वादग्रस्त वातावरण निर्माण झाल्यानंतर व्हिडिओवर उदित नारायण यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे.

उदित नारायण म्हणाले, ‘आम्हाला पाहिल्यानंतर चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचतो. आम्ही सभ्य लोकं आहोत. चाहते फक्त आमच्यावर प्रेम व्यक्त करत असतात. असं असताना या गोष्टीची चर्चा का करायची? गर्दीत बरेच लोकं आहेत आणि आमचे बॉडीगार्ड देखील आहेत. पण चाहत्यांना भेटण्याची संधी मिळतेय असं वाटतं म्हणून कुणी हात पुढे करतात तर कुणी हाताचं चुंबन घेतात… हा सगळा उत्साह आहे. याकडे एवढं लक्ष देऊ नका… असं म्हणत उदित नारायण यांनी स्पष्टीकरण दिलं.

व्हायरल व्हिडीओवर अनेकांचा संताप…

व्हिडीओवर कमेंट करत एक युजर म्हणाला, ‘उदित नारायण… थांबा सर’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘काय गैरवर्तन आहे, उदित नारायण खरंच असं करू शकतात?’ अनेकांनी उदित नारायण यांच्यावर संताप व्यक्त केला, तर अनेकांनी त्यांची बाजू घेतली आहे.

गावात कुत्रं विचारत नाही..;अविनाश जाधवांचं भाजप नेत्यांना खरमरीत उत्तर
गावात कुत्रं विचारत नाही..;अविनाश जाधवांचं भाजप नेत्यांना खरमरीत उत्तर.
माझ्या पत्नीच्या नावाने सावली बार, पण..; रामदास कदमांचा खुलासा
माझ्या पत्नीच्या नावाने सावली बार, पण..; रामदास कदमांचा खुलासा.
हनीट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
हनीट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा.
निशिकांत दुबेने पुन्हा राज ठाकरेंना चिमटी काढली, म्हणाले..
निशिकांत दुबेने पुन्हा राज ठाकरेंना चिमटी काढली, म्हणाले...
भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद का नाही? राऊतांचा मोठा दावा
भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद का नाही? राऊतांचा मोठा दावा.
राज ठाकरेंच्या विरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका; काय आहे प्रकरण?
राज ठाकरेंच्या विरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका; काय आहे प्रकरण?.
मातोश्रीवर शकुनी मामा बसलेला आहे; नितेश राणे ठाकरे बंधूंवर बरसले
मातोश्रीवर शकुनी मामा बसलेला आहे; नितेश राणे ठाकरे बंधूंवर बरसले.
खळ्ळखट्याकची भाषा वापरताच मुनगंटीवारांनी काढले राज ठाकरेंचे संस्कार
खळ्ळखट्याकची भाषा वापरताच मुनगंटीवारांनी काढले राज ठाकरेंचे संस्कार.
दाऊदला देखील पक्ष प्रवेश मिळेल; संजय राऊतांची फटकेबाजी
दाऊदला देखील पक्ष प्रवेश मिळेल; संजय राऊतांची फटकेबाजी.
घालीन लोटांगण, वंदीन चरण..; उद्धव ठाकरेंची खरपूस टीका
घालीन लोटांगण, वंदीन चरण..; उद्धव ठाकरेंची खरपूस टीका.