तुरुंगात अंडरवर्ल्ड डॉनची सुंदर गर्लफ्रेंड, तिच्या बाथरुममधील कॅमेरा आणि ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याने रचलेला कट
1 वर्ष तुरुंगात कैद होती अंडरवर्ल्ड डॉनची सुंदर गर्लफ्रेंड, तिच्या सौंदर्यावर फिदा होते पोलीस अधिकारी, तिच्या बाथरुमधील कॅमेरा आणि पोलीस अधिकाऱ्याने रचलेला कट धक्कादायक आहे सत्य

एककाळ असा होता जेव्हा बॉलिवूडवर अंडरवर्ल्ड डॉनची दहशत होती. अनेक अभिनेत्रींसोबत डॉनच्या नावाची चर्चा देखील रंगली. एवढंच नाही तर, डॉनसोबत संबंध असल्यामुळे अभिनेत्रींना तुरुंगवास देखील भोगावा लागला. अभिनेत्री मोनिका बेदी हिने करियरच्या उच्च शिखरावर असताना अबू सलेम याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली आणि स्वतःचं संपूर्ण करीयर उद्ध्वस्त करुन घेतलं. मोनिका हिला 1 वर्षाचा तुरुंगवास देखील भोगावा लागला.
तुरुंगात देखील अभिनेत्रीला मोठ्या समस्येचा सामना करावा लागला. बनावट पासपोर्ट प्रकरणात मोनिकाला प्रथम भोपाळच्या जहांगीराबाद पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आणि नंतर भोपाळ मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले. तुरुंगात एक अधिकारी असा होता जो मोनिकाला अनेक गोष्टी पुरवायचा… पण तो अधिकारी तिच्यासाठी काही दिवसांनंतर धोक्याची घंटा ठरला.
मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळ सेंट्रल जेलचा जेलर पुरुषोत्तम सोमकुंवर मोनिकाच्या सौंदर्याने वेडा झाला होता. मोनिकाला पाहिल्यानंतर जेलर पूर्णपणे तिच्यावर घायाळ झाला होता. तो अभिनेत्रीच्या सर्व इच्छा पूर्ण करत होता. अशी देखील माहिती समोर आली होती की, मोनिका हिला तुरुंगात अंघोळीसाठी साबण देखील दिला जायचा.
एवढंच नाही तर, तुरुंगात असताना मोनिका हिच्यासाठी वेगवेगळ्या हॉटेलमधून जेवणं यायचं. अभिनेत्रीचं सौंदर्य बिघडू नये म्हणून, सर्व प्रकारचे सौंदर्यप्रसाधने देखील जेलर तुरुंगात पोहोचवत होता. मोनिका तुरुंगात असल्यामुळे अधिकारी कामाचे तास संपल्यानंतर देखील घरी जात नव्हते. पण एक दिवस तर हद्दच पार झाली.
व्हायरल झाले अभिनेत्री फोटो
तुरुंगात असं काही घडलं ज्याची चर्चा सर्वत्र तुफान रंगली. ज्या तुरुंगात मोनिका कैदी म्हणून होती, तेथील बाथरुम मधील काही फोटो तुफान व्हायरल झाले. तेव्हा बाथरुममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आलेला. हे सर्व कॅमेरे जेलर पुरुषोत्तमने लावले होते.
अशा कृतीनंतर जेलरवर कारवाई केली. जेलरला त्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता असल्याबद्दल अटक करण्यात आली. सांगायचं झालं, अभिनेत्री एक वर्ष तुरुंगात होती. तुरुंगातून सुटल्यानंतर अभिनेत्री आनंदी आयुष्य जगत आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
