Uorfi Javed | मुली सर्वात असुरक्षित जवळच्या नातेवाईकांकडूनच, उर्फी जावेद हिचा खळबळजनक दावा
उर्फी जावेद ही नेहमीच चर्चेत असते. उर्फी जावेद ही नेहमीच अतरंगी स्टाईलमध्ये दिसते. उर्फी जावेद हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. उर्फी जावेद हिला नेहमीच तिच्या कपड्यांमुळे थेट जीवे मारण्याच्या धमक्या या दिल्या जातात. मात्र, याचा काहीच परिणाम उर्फी जावेदवर होत नाही.

मुंबई : उर्फी जावेद हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. मुळात म्हणजे उर्फी जावेद (Uorfi Javed) ही कधी काय घालेल याचा अजिबातच अंदाजा नसतो. उर्फी जावेद हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये एक खास ओळख ही नक्कीच मिळवली आहे. उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीपासून मिळाली आहे. उर्फी जावेद हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही देखील सोशल मीडियावर बघायला मिळते. अनेकदा उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात देखील अडकते. उर्फी जावेद ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. उर्फी आपल्या चाहत्यांसाठी कायमच सोशल मीडियावर बोल्ड फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करताना दिसते.
उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते की, मी समाजासाठी एक मोठी डाग आहे. मात्र, मी आता परत वापस पण येऊ शकत नाही. कारण मी आता जरी परत येण्याचा विचार केला तरीही ते शक्य नाहीये. कारण काही गोष्टी या सोशल मीडियावर कायमच राहणार आहे. मी खरोखरच खूप जास्त वाईट असल्याचे देखील उर्फी जावेद हिने म्हटले होते.
काही दिवसांपूर्वीच उर्फी जावेद हिने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये उर्फी जावेद ही मुलींच्या सुरक्षेबद्दल बोलताना दिसली. उर्फी जावेद म्हणाली की, मुलींना सर्वात जास्त धोका हा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडूनच असतो किंवा शेजाऱ्यांकडून असतो. सर्वात जास्त बलात्कार हे जवळचे नातेवाईक करतात. जरी एखाद्या मुलीने ही गोष्टी तिच्या घरच्यांना सांगितली तर घरचे देखील तिला शांत राहण्यास सांगतात.
पुढे उर्फी म्हणाली की, मला वाटते की, मुलींना कंट्रोल करणे फार सोपे काम आहे. यामुळे त्या नेहमीच अत्याचाराच्या शिकार ठरतात. महत्वाचे म्हणजे अगोदरचे लोक नेहमीच म्हणायचे की, आमच्या मुली आणि महिला आम्हाला विचारल्याशिवाय घराच्या अजिबातच बाहेर पडत नाहीत. नेहमीच महिलांना वेगळी वागणूक दिली जाते.
उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वीच मोठा खुलासा करत म्हटले होते की, माझे वडिल हे मला कायमच मारहाण करत असत. मी त्यांच्या मारहाणीला कंटाळले होते. उर्फी जावेद ही काही वर्षांपूर्वीच मुंबईमध्ये आली होती. उर्फी जावेद हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांपासून केली आहे. उर्फी जावेद हिने अनेक हिट मालिकांमध्ये काम केले आहे.
