फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होणार ‘हे’ 5 सिनेमे, 2 स्टारकिड मोठ्या पडद्यावर करणार पदार्पण
Upcoming Bollywood Movies: सिनेमा प्रेमींसाठी फेब्रुवारी महिना खास ठरणार आहे. फेब्रुवारीमध्ये एक दोन नाही तर पाच सिनेमे मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन होणार आहे. सांगायचं झालं तर फेब्रुवारी 2025 मध्ये दोन स्टारकिड्स देखील मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहेत. त्यामुळे फेब्रुवारी महिना खास ठरणार आहे.

Upcoming Bollywood Movies : शुक्रवारी चित्रपटगृहात नवीन सिनेमे तयार होत असतात. जानेवारी महिन्यात ‘आजाद’, ‘इमरजेन्सी’ आणि ‘स्कय फोर्स’ सिनेमे मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाले. आता फेब्रुवारी महिन्यात कोणते सिनेमे मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार याची उत्सुकता चाहत्यांच्या मनात आहे. सिनेमा प्रेमींसाठी फेब्रुवारी महिना खास ठरणार आहे. फेब्रुवारीमध्ये एक दोन नाही तर पाच सिनेमे मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहेत. एवढंच नाही तर, दोन स्टारकिड्स देखील मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहेत.
चित्रपटगृहात प्रदर्शित होणार ‘हे’ पाच सिनेमे
लवयापा – नावाचा चित्रपट 7 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. आमिर खानचा मुलगा जुनैद खान आणि बोनी कपूरची लहान मुलगी खुशी कपूर या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. दोघेही पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत.खुशी आणि जुनैद ‘लवयापा’ चित्रपटाच्या माध्यमातूम बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणारे हे दोन स्टार्स किती अप्रतिम कामगिरी करतात हे पाहणे बाकी आहे.
बॅडएस रविकुमार- गायक हिमेश रेशमिया देखील एक चित्रपट घेऊन येत आहे. ‘बॅडएस रविकुमार’ असं त्याच्या चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपटही ७ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. हा एक ॲक्शन-म्युझिकल चित्रपट आहे, पण त्यात तुम्हाला 80 च्या दशकातील ॲक्शन पाहायला मिळेल.
छावा- फेब्रुवारी महिन्यातील हा सर्वात मोठा चित्रपट आहे. छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित या चित्रपटात अभिनेता विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहे.सिनेमात विकी सोबक अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आला. 14 फेब्रुवारी रोजी सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे.
मेरे हस्बैंड की बीवी – अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंग स्टारर चित्रपट ‘मेरे हस्बैंड की बीवी प्रदर्शित होणार आहे. मुदस्सर अजीज यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट 21 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.
इन गलियों में – या यादीमध्ये सगळ्यात शेवटचं नाव ‘इन गलियों में’ सिनेमाचं आहे. सिनेमात जावेद जाफरी आणि विवान शाह मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. सिनेमा 28 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
