AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऋषभ पंतच्या वाढदिवशी उर्वशी रौतेलाची दणक्यात पार्टी; पहा Video

आधी म्हणाली 'छोटू भैय्या' आता फ्लाईंग किससह दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

ऋषभ पंतच्या वाढदिवशी उर्वशी रौतेलाची दणक्यात पार्टी; पहा Video
Urvashi Rautela and Rishabh PantImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 04, 2022 | 4:17 PM
Share

मुंबई- अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautel) आणि क्रिकेटर ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्यातील वाद सोशल मीडियावर चांगलाच गाजला. या दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना टोमणे मारले. त्यानंतर आता ऋषभच्या वाढदिवसानिमित्त उर्वशीच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ समोर आला आहे. उर्वशी एका रेस्तराँमध्ये बसलेली पहायला मिळतेय आणि ती वाढदिवस साजरा करतेय. ऋषभसोबतचा वाद विसरत उर्वशीने आधी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आता सेलिब्रेशनचा व्हिडीओ समोर आल्याने चाहत्यांमध्ये पुन्हा चर्चा रंगली आहे.

हा व्हिडीओ पाहून उर्वशी नक्की कोणासोबत बर्थडे सेलिब्रेशन करतेय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर तिच्या या व्हिडीओमध्ये ऋषभ पंत नाही तर मिशेल मोरोन आहे. इटालियन अभिनेता मिशेलचा वाढदिवस 3 ऑक्टोबर रोजी होता. त्याच्याच सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एक दिवसानंतर लगेच ऋषभचा वाढदिवस असल्याने नेटकरी त्याच्या नावाने हा व्हिडीओ शेअर करतायत.

उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओवरूनही चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. लाल रंगाचा ड्रेस परिधान करून उर्वशी या व्हिडीओत फ्लाइंग किस देताना पहायला मिळतेय. विशेष म्हणजे तिने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ‘हॅप्पी बर्थडे’ असं लिहिलंय. यात विशेष एका व्यक्तीचं नाव लिहिलं नसलं तरी तिने खास ऋषभलाच शुभेच्छा दिल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे.

ऋषभ पंत-उर्वशी रौतेलाचा वाद-

आरपी नावाचा व्यक्ती मला भेटण्यासाठी हॉटेलच्या बाल्कनीमध्ये वाट पाहत होता, असं उर्वशीने एका मुलाखतीत म्हटलं होतं. हा आरपी दुसरा तिसरा कोणी नसून क्रिकेटर ऋषभ पंत असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला होता. त्यावर ऋषभनेही इन्स्टा स्टोरीमध्ये उर्वशीला उत्तर दिलं होतं. ‘लोकप्रियता मिळवण्यासाठी काही जण खोटं बोलतात’, असंच तो थेट या पोस्टमध्ये म्हणाला होता. त्यानंतर भडकलेल्या उर्वशीने लिहिलं, ‘छोटू भैय्याने बॅट-बॉलच खेळलं पाहिजे. बदनाम होण्यासाठी मी काही मुन्नी नाही. डार्लिंग तुला रक्षाबंधनच्या शुभेच्छा.’

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.