AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“शो-ऑफ असता तर..”; सैफवरील हल्ल्यानंतर डायमंड वॉचबद्दल बोलणाऱ्या उर्वशी रौतेलाचं स्पष्टीकरण

अभिनेत्री उर्वशी रौतेलाची एक मुलाखत सोशल मीडियावर तुफान चर्चेत होती. या मुलाखतीत तिला सैफ अली खानवरील हल्ल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र त्यावर प्रतिक्रिया देताना ती अचानक तिला मिळालेल्या महागड्या भेटवस्तूंबद्दल बोलू लागली होती.

शो-ऑफ असता तर..; सैफवरील हल्ल्यानंतर डायमंड वॉचबद्दल बोलणाऱ्या उर्वशी रौतेलाचं स्पष्टीकरण
Urvashi RautelaImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 27, 2025 | 1:31 PM
Share

अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्री उर्वशी रौतेला भलतं-सलतंच बोलून गेल्याने सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग झाली. एका मुलाखतीत तिला सैफवरील हल्ल्याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. त्यावर बोलताना तिने अचानक विषय तिच्या महागड्या भेटवस्तूंकडे वळवला. आई-वडिलांनी कशापद्धतीने तिला डायमंडचं रोलेक्स घड्याळ आणि इतर दागिने दिले, हे ती सांगू लागली होती. उर्वशीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि त्यावरून नेटकऱ्यांनी तिला सुनावलं. या ट्रोलिंगनंतर तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित सैफची माफी मागितली. मात्र काही वेळानंतर तिने माफीची पोस्टसुद्धा डिलिट केली. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उर्वशी त्या संपूर्ण प्रकरणाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. मला सैफवरील हल्ल्याबाबत संपूर्ण माहिती नव्हती असं तिने स्पष्ट केलं.

‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीत उर्वशी म्हणाली, “मला वाटतं मी थोडं काळजीपूर्वक उत्तर द्यायला पाहिजे होतं. सैफवर हल्ला मध्यरात्रीच्या सुमारास झाला आणि त्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता मी ती मुलाखत दिली होती. त्यामुळे घटनेच्या गांभीर्याबाबत मला काहीच कल्पना नव्हती. मला इतकंच आठवतंय की सकाळी उठल्यावर मला कोणीतरी सांगितलं की सैफवर हल्ला झाला आहे. ती घटना किती गंभीर होती, हे मला माहीत नव्हतं.”

“माझ्या डाकू महाराज या चित्रपटाच्या यशाबद्दलची ती मुलाखत होती. त्यामुळे त्याबद्दल त्यात बोलणं साहजिक होतं. काहींना वाटलं की मी सैफवर हल्ला करणाऱ्या चोराला ‘डाकू महाराज’ म्हणाले. पण खरंतर ते माझ्या चित्रपटाचं नाव आहे. मी माझ्या आईवडिलांवर खूप प्रेम करते. माझ्यासाठी ते देवासमान आहेत. त्यामुळे त्यांनी मला ज्या भेटवस्तू दिल्या, त्यासाठी मी खूप खुश होते. आपण हिंदीत बोलतो ना की, जोश में होश खो देना (उत्साहाच्या भरात तारतम्य न बाळगणं). माझ्यासोबतही असंच काहीसं घडलं होतं. पण अर्थातच तो माझा शो-ऑफ नव्हता. कारण जर शो ऑफ असता तर मी छोटीशी मिनी वॉच दाखवली नसती”, असं तिने पुढे स्पष्ट केलं.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...