AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैभवी ते नितेश पांडे.. सोशल मीडियावर अखेरची पोस्ट पाहून तुम्हीही व्हाल भावूक!

हिंदी टेलिव्हिजन विश्वातील या तीन कलाकारांशिवाय बंगाली टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ताचंही गेल्या आठवड्यात निधन झालं. शूटिंगनंतर ती घरी परतत होती. त्यावेळी तिचा अपघात झाला होता.

वैभवी ते नितेश पांडे.. सोशल मीडियावर अखेरची पोस्ट पाहून तुम्हीही व्हाल भावूक!
Vaibhavi, Nitesh and AdityaImage Credit source: Instagram
| Updated on: May 24, 2023 | 2:47 PM
Share

मुंबई : टेलिव्हिजन इंडस्ट्रीसाठी हा आठवडा अत्यंत दु:खद आहे. गेल्या तीन दिवसांत तीन लोकप्रिय कलाकारांनी आपले प्राण गमावले आहेत. आधी 22 मे रोजी अभिनेता आणि मॉडेल आदित्य सिंह राजपूतचं निधन झालं. त्यानंतर 23 मे रोजी ‘साराभाई वर्सेस साराभाई’ मालिकेतील अभिनेत्री वैभवी उपाध्यायचा कार अपघातात दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर आज (24 मे) सकाळी ‘अनुपमा’ फेम अभिनेता नितेश पांडेचं कार्डिॲक अरेस्टने निधन झालं. या तिघांच्या निधनाने टेलिव्हिजन इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर त्यांच्यासाठी भावूक पोस्ट लिहिली आहे, तर काहींनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यादरम्यान वैभवी, नितेश आणि आदित्य यांचे सोशल मीडियावर शेवटचे पोस्ट चर्चेत आले आहेत.

नितेश पांडे यांची शेवटची पोस्ट-

नितेश पांडे यांनी फेब्रुवारीमध्ये इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये ते गार्डनमध्ये त्यांच्या पाळीव श्वानासोबत दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पहायला मिळतोय. या व्हिडीओमागे जे गाणं वाजतंय, त्याचे बोल असे आहेत, ‘बिखरने का मुझको शौक है बडा.. समेटेगा मुझे तू बता जरा.’

वैभवी उपाध्यायची शेवटची पोस्ट-

वैभवीने 6 मे रोजी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये ती हिमाचल प्रदेशच्या निसर्गाचा आनंद लुटताना दिसतेय. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय, ‘सर्वकाही सोडून द्या आणि फक्त एकदा मोकळा श्वास घ्या.’ वैभवी तिचं आयुष्य अत्यंत खुलेपणानं जगायची, हे तिच्या इतर पोस्टमधूनही पहायला मिळतंय.

आदित्य सिंह राजपूतची पोस्ट-

आदित्यने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये तो आनंदाविषयी बोलताना दिसत आहे. यात तो म्हणतोय की, पैसे गरजेचे असतात पण आनंद हा सर्वांत जास्त गरजेचा असतो. आईच्या हातचं जेवण जेवण्यात आनंद आहे, आपल्या पाळीव प्राण्यासोबत खेळण्यात आनंद आहे, असं तो म्हणतो. रोजच्या जीवनातील छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद कसा शोधायचा, याबाबत तो व्हिडीओत बोलताना दिसतोय.

हिंदी टेलिव्हिजन विश्वातील या तीन कलाकारांशिवाय बंगाली टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ताचंही गेल्या आठवड्यात निधन झालं. शूटिंगनंतर ती घरी परतत होती. त्यावेळी तिचा अपघात झाला होता. कोलकातामधील पानीहाटी याठिकाणी सुचंद्रा राहते. शूटिंगनंतर घरी जाण्यासाठी तिने एका ॲपवरून बाईक बुक केली होती. घोषपारा याठिकाणी बारानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिचा अपघात झाला. यावेळी सुचंद्राने हेल्मेट घातला होता. मात्र हा अपघात इतका भीषण होता, की तिच्या हेल्मेटचेही तुकडे-तुकडे झाले होते.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.