Varun-Natasha Wedding | वरुण नताशाचं लग्न, सोशल मीडियावर मिम्सची लाट!

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि नताशा दलाल (Natasha Dalal) आज लग्न बंधनात अडकणार आहेत.

Varun-Natasha Wedding | वरुण नताशाचं लग्न, सोशल मीडियावर मिम्सची लाट!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि नताशा दलाल (Natasha Dalal) आज लग्न बंधनात अडकणार आहेत. वरुण आणि नताशाच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. वरुण धवनचा मेहंदीचा फोटो व्हायरल होता. या फोटोमध्ये वरुण डिझाईनर मनीष मल्होत्रा ​​आणि इतरांसह दिसत होता. वरुणने या फोटोमध्ये ट्रॅडिशनल आऊटफिट आणि जॅकेट घातलेले दिसत होते. मात्र, वरुण आणि नताशाच्या लग्नाशी संबंधित अनेक मीम्स आणि जोक्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (Varun Dhawan-Natasha Dalal wedding and mimes on social media)

वरुणचे बॉलिवूडमधील मित्र करण जोहर, मनीष मल्होत्रा, सारा अली खान, अर्जुन कपूर-मलाइका अरोरा, जाह्नवी कपूर-खुशी कपूर, कतरिना कैफ, नीतू कपूर, कियारा अडवाणी, अनिल कपूर, रिया कपूर आणि हर्षवर्धन कपूर या लग्नात सहभागी होणार आहेत. कोण आहे नताशा दलाल?

नताशा दलाल एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. तिने आतापर्यंत अनेक बॉलिवूडमधील सेलेब्रिटींसाठी ड्रेस डिझाईन केले आहेत. तसेच वरुण धवन आणि नताशा लहापणापासूनचे मित्र आहेत. नताशाने न्यूयॉर्कमधून फॅशन डिझाईनिंगचे शिक्षण घेतले आहे. सध्या ती मुंबईत आई -वडिलांसोबत राहते. नताशाचे वडील उद्योगपती असून आई गृहिणी आहे. विशेष म्हणजे नताशाचा आवडता अभिनेताही वरुण धवन आहे.

संबंधित बातम्या : 

Varun-Natasha Wedding : वरुण आणि नताशाच्या लग्नासाठी खास बंदोबस्त, लग्नस्थळी मोबाईल वापरण्यास मनाई

Varun-Natasha Wedding: लग्न समारंभासाठी वरुण आणि नताशाचे कुटुंबीय अलिबागला, पाहा फोटो

(Varun Dhawan-Natasha Dalal wedding and mimes on social media)

Published On - 6:05 pm, Sun, 24 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI