Varun-Natasha Wedding: लग्न समारंभासाठी वरुण आणि नताशाचे कुटुंबीय अलिबागला, पाहा फोटो

वरुण धवन आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल दोघं येत्या 24 जानेवारीला अलिबागमध्ये लग्न करणार आहेत. (Varun and Natasha's family went to Alibag for wedding ceremony)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:35 PM, 22 Jan 2021
Varun-Natasha Wedding: लग्न समारंभासाठी वरुण आणि नताशाचे कुटुंबीय अलिबागला, पाहा फोटो

मुंबई  : वरुण धवन आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल दोघं येत्या 24 जानेवारीला अलिबागमध्ये लग्न करणार आहेत. यासाठी नताशा अलीबागसाठी रवाना झाली आहे. दरम्यान काही फोटो समोर आले आहेत ज्यात नताशा तिच्या फॅमिलीसोबत अलिबागला जाताना दिसली आहे. यावेळी तिनं पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.

सोबतच वरुण धवनसुद्धा कुटुंबियांसोबत अलिबागला रवाना झाला आहे. एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये वरुण धवन आपल्या कुटुंबियांसोबत अली बागकडे जाताना दिसतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

दुसरीकडे नताशाच्या कपड्यांचा फोटोसुद्धा समोर आला आहे. टीमचे काही लोक काल संध्याकाळी आउटफिट्ससह नताशाच्या घरी पोहोचले. नताशानं तिच्या लग्नासाठी पेस्टल शेड लेहेंगा निवडला आहे.

याशिवाय वेडिंग व्हेन्यूवर लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आहे, या ठिकाणाचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. वरुण-नताशाचं लग्न अलीबागच्या मॅन्शनमध्ये होणार आहे. वरुण धवन आणि नताशा दलाल आज आपल्या कुटूंबियांसह अलिबागला पोहोचतील. आजपासून 24 पर्यंत लग्नाच्या विधी सुरू होतील.

वरुण आणि नताशाच्या लग्नाच्या कार्यक्रमाची सुरुवात संगीत सोहळ्यानं होणार आहे. वरुणचे बॉलिवूड मित्र करण जोहर, मनीष मल्होत्रा, सारा अली खान, अर्जुन कपूर-मलाइका अरोरा, जाह्नवी कपूर-खुशी कपूर, कतरिना कैफ, नीतू कपूर, कियारा अडवाणी, अनिल कपूर, रिया कपूर आणि हर्षवर्धन कपूर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

लग्नाला सलमान खानही लावणार हजेरी

डेव्हिड धवन आणि सलमान खान यांच्यात चांगला बॉन्ड आहे त्यामुळे सलमानही लग्नाला हजेरी लावणार आहे. त्याचबरोबर करण जोहर संगीत समारंभात दमदार परफॉर्मंस देणार आहेत.

संबंधित बातम्या 

Varun-Natasha Wedding | वरुण-नताशाचे ‘ग्रँड वेडिंग’, नताशाचा ‘लेहंगा’ इंटरनेटवर चर्चेत, पाहा फोटो…

आई बनल्यानंतर प्रथमच घराबाहेर पडली अनुष्का, सोबत लेकही…