‘बोटं मात्र माझ्याकडं’, लग्नानंतर धर्मेंद्रसोबत न राहण्याचा निर्णय हेमा मालिनी यांनी का घेतला?
Veteran Actor Dharmendra Health Update : हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाला साजेशी आहे. पण लग्नानंतर हेमा मालिनी आणि धर्मेंद्र एकत्र एकाच घरात का राहिले नाही, काय होते ते कारण?

Bollywood Actor Dharmendra-Hema Malini : अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची प्रेमकहाणी बॉलिवडूमधील एखाद्या चित्रपटासारखीच गाजली. ती आजही चर्चेत आहे. या प्रेमकहाणीला अनेक रंग आहेत. 1970 मध्ये ‘तू हसीन मैं जवान’ या चित्रपटात दोघांनी सर्वात अगदोर एकत्र काम केले. तिथून या दोन्ही स्टार्सचे सूत जुळले. पण धर्मेंद्र यांचे प्रकाश कौर यांच्याशी अगोदरच लग्न झाले होते. त्यावेळी त्यांना चार मुलंही होती. त्यामुळे या नवीन नात्याने दोघांचे वैयक्तिक जीवन ढवळून निघाले.
हेमा मालिनी यांच्या आत्मकथेत काय खुलासा?
बियॉन्ड द ड्रीम गर्ल (Beyond the Dream Girl) या आत्मचरित्रात हेमा मालिनी यांनी त्यांची प्रेमकथा, लग्न आणि मुल या सर्वांची भावनिक गुंतागुंत मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांनी उघडपणे बाजू मांडली. धर्मेंद्रपासून स्वतंत्र राहण्याचा निर्णय का घेतला याचा उलगडा त्यांनी यामध्ये केला. शांतता आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी तिने धरमपाजीपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी आत्मचरित्रात स्पष्ट केले. “मला कोणलाही त्रास द्यायचा नव्हता. धर्मजींनी माझ्यासाठी आणि माझ्या मुलींसाठी जे काही केले. त्याबद्दल मी आनंदी आहे”, असे हेमा मालिनी यांनी पुस्तकात नमूद केले आहे.
बोटं उचलली नि आरोपांची राळ उठली
“अनेकदा मला दुसरी स्त्री असा टोमणा मारण्यात आला. मला अनेकदा कठोर निर्णयाचा सामना करावा लागला. तरीही धर्मेंद्र यांची निवड केल्याचा कोणताही आणि कधीही पाश्चाताप झाला नसल्याचे हेमा मालिनी यांनी नमूद केले. आमच्या दोघांवर अनेक आरोप करण्यात आले. मला माहिती होते की माझ्या पाठीमागे लोक आमच्या नात्याविषयी, माझ्याविषयी काय बोलतात. पण मला माहिती होते की धर्मजी माझ्या पाठीशी आहेत. ते मला आनंदी ठेवत होते आणि मला हा कौटुंबिक आनंद, जिव्हाळा जपायचा होता.” अशी भावना ओढताण त्यांनी आत्मचरित्रात मांडली.
लग्नाने एकटेपणा दिला
हेमाजी म्हणतात की अनेकजण म्हणतात की लग्नाने तिला एकटेपणा दिला. तर मला असे अजिबात वाटत नाही. माझे जीवन हे इतरांच्या कल्पनेपेक्षा खूप दूर आहे. पण मला कधीही पोलीस अधिकाऱ्यासारखं त्याच्यावर लक्ष ठेवण्याची गरज पडली नाही. धर्मजी माझ्या घरी कितीदा येतात हे दाखवण्यासाठी रजिस्टर दाखवण्याची गरज नाही. कारण धर्मजी हे वडील म्हणून त्यांचे कर्तव्य कधी चुकले नाही आणि त्यांना मी कधी त्याची आठवण करून देण्याची गरज पडली नाही, असे हेमा मालिनी यांनी स्पष्ट केले.
या नात्याबद्दल कधीच नाराज नाही, जे आहे ते स्वीकारले
लेहरेन रेट्रोला नुकत्याच दिलेल्या एका ताज्या मुलाखतीत हेमा मालिनी यांनी धर्मजींसोबतचे नाते, त्यांच्याशी संबंध, वाद विवाद याबाबत भावनांना वाट मोकळी करून दिली. माझे लग्न पारंपारिक लग्नाप्रमाणे नव्हते. कोणीही असे जगू इच्छित नाही.पण जे घडत आहे ते तुम्हाला स्वीकारावे लागते. जे घडले त्याबद्दल मी कधी नाराज नाही. मी माझ्या निर्णयावर आनंदी आहे. माझी दोन मुलं आहेत आणि मी त्यांना चांगल्या प्रकारे वाढवले आहे असे हेमा मालिनी यांनी या मुलाखतीत सांगितले.
