AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं रविवारी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर आज (सोमवार) अंत्यसंस्कार केले जातील. सुमन कल्याणपूर यांनी हिंदी आणि मराठीत अनेक अजरामर गाणी गायली आहेत.

सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Suman KalyanpurImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 01, 2026 | 11:57 AM
Share

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीला आपल्या सुमधुर आवाजाने समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांचं रविवारी निधन झालं. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एक सुवर्णपर्व संपलं आहे. आज (सोमवार) दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी शिवशक्ती अपार्टमेंट इथं ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 2 वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. सुमन कल्याणपूर यांनी हिंदी आणि मराठीत अनेक अजरामर गाणी गायली आहेत. ‘ना तुम हमे जानो’, ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे’, ‘रिमझिम के तराने लेके’ तसंच ‘केतकीच्या बनी’, ‘जिथे सागरा धरणी मिळते’ ही गाणी रसिकांच्या ओठावर कायम राहतील.

सुमन कल्याणपूर यांच्या जाण्याने बॉलिवूडने एक हरहुन्नरी आणि सुरेल गायिका गमावली आहे. संगीत क्षेत्राची ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील गोडवा आणि त्यांनी गायलेली गाणी पिढ्यानपिढ्या रसिकांच्या मनात घर करून राहतील. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास सुमन यांचं निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सात दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या सुमधूर आवाजाच्या बळावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. ‘नाविका रे वारा वाहे रे’, ‘आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही’ अशी अनेक गाणी त्यांनी आपल्या सुमधूर आवाजाने अजरामर केली आहेत.

सुमन कल्याणपूर यांचं लग्नाआधीचं नाव सुमन हेमाडी असं होतं. बांगलादेशमधल्या ढाका इथं 1937 साली त्यांचा जन्म झाला होता. त्यानंतर 1943 मध्ये त्यांचं कुटुंब मुंबईत स्थायिक झालं. इथूनच त्यांच्या गायनाच्या प्रवासाला खरी सुरुवात झाली. रामानंद कल्याणपूर यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्या सुमन कल्याणपूर म्हणून परिचित झाल्या. त्यांनी पंडित लक्ष्मणराव अमृते यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. 1954 मध्ये ‘दरवाजा’ या चित्रपटासाठी त्यांनी पहिलं पार्श्वगायन केलं. लता मंगेशकर यांच्या गायकीशी साम्य असल्यामुळे सुरुवातीला त्यांना काही संगीतकारांनी ‘दुसरी लता’ म्हणून पाहिलं.

‘निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई’, ‘कशी गवळण राधा बावरली’, ‘केतकीच्या बनी तेथे नाचला ग मोर’, ‘केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा’, ‘देव माझा विठु सावळा’, ‘उठा उठा चिऊताली’ अशा त्यांनी गायलेल्या विविध मराठी गाण्यांनी एक काळ गाजवला.

Follow Us
त्या पुराण पुरुषांच्या यादीत लखानी अग्रस्थानी; सुप्रिया सुळेंच्या...
त्या पुराण पुरुषांच्या यादीत लखानी अग्रस्थानी; सुप्रिया सुळेंच्या....
भाऊ खुर्चीवर, बहीण वाऱ्यावर! 80 लाख महिलांचा श्राप महायुतीला लागणार?
भाऊ खुर्चीवर, बहीण वाऱ्यावर! 80 लाख महिलांचा श्राप महायुतीला लागणार?.
कोकणच्या जागेवर तटकरेंचा डंका! अनिकेत तटकरे महायुतीचे उमेदवार?
कोकणच्या जागेवर तटकरेंचा डंका! अनिकेत तटकरे महायुतीचे उमेदवार?.
सुप्रिया सुळे यांच्या व्याहींसह भाजपचे 11 उमेदवार जाहीर; नवे चेहरे कोण
सुप्रिया सुळे यांच्या व्याहींसह भाजपचे 11 उमेदवार जाहीर; नवे चेहरे कोण.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मृत्यूचा थरार! कंटेनर-ट्रकची भीषण धडक....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मृत्यूचा थरार! कंटेनर-ट्रकची भीषण धडक.....
जायकवाडी धरणात दुर्दैवी दुर्घटना; पाण्यात बुडून दोन मित्रांचा मृत्यू
जायकवाडी धरणात दुर्दैवी दुर्घटना; पाण्यात बुडून दोन मित्रांचा मृत्यू.
महागाईचा आणखी एक झटका! LPG सिलेंडर पुन्हा महाग, खिशाला कात्री
महागाईचा आणखी एक झटका! LPG सिलेंडर पुन्हा महाग, खिशाला कात्री.
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त.
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या...
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या....
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी...
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी....