‘छावा’चा व्यवसाय वाढता वाढता वाढे…, फक्त भारतातच नाही तर, जगभरात सिनेमाची छप्पर फाड कमाई
Chhaava Worldwide Box Office Collection: चौदा दिवसांपासून 'छावा' सिनेमाच्या कमाईत होतेय तगडी वाढ, फक्त भारतातच नाही तर, जगभरात सिनेमा करतोय छप्पर फाड कमाई, जगभरातील कमाईचा आकडा जाणून व्हाल चकित

Chhaava Worldwide Box Office Collection: छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यावर आधारलेला ‘छावा’ सिनेमा सध्या तुफान चर्चेत आहे. सिनेमाने फक्त भारतातच नाही तर, साता समुद्रापार देखील नवीन विक्रम रचले आहेत. देशात सिनेमाने 400 कोटींचा आकडा ओलांडला आहे तर, जगभरात सिनेमाने 500 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. तर 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ सिनेमाने आतापर्यंत किती कोटींचा गल्ला जमा केला जाणून घेवू… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘छावा’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.
अभिनेता विकी कौशल स्टारर ‘छावा’ सिनेमा यंदाच्या वर्षाचा 500 कोटींच्या घरात प्रवेश करणारा पहिला सिनेमा आहे. पहिल्या 12 दिवसांमध्ये हा रेकॉर्ड सिनेमाने आपल्या नावावर केला आहे. एवढंच नाही तर, विकी कौशल याच्या करीयर मधील देखील ‘छावा’ सर्वाधिक कमाई करणारा पहिला सिनेमा आहे. ‘छावा’ सिनेमामुळे विकीच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली आहे.
View this post on Instagram
ट्रेंड विश्लेषक तरण आदर्श यांच्यानुसार, ‘छावा’ सिनेमाने दुसऱ्या गुरुवारी म्हणजे 14 व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 13.60 कोटी रुपयांची कमाई केली आहे. याचप्रमाणे देशभरात सिनेमाने 411.46 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता येत्या दिवसांत सिनेमा किती कोटींपर्यंत मजल मारेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘छावा’ सिनेमात विकी कौशल याच्यासोबत रश्मिका मंदाना, आशुतोष राणा, डायना पेंटी, विनीत कुमार सिंह यांसारख्या सेलिब्रिटींनी दमदार भूमिका साकारली आहे. सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये सिनेमातील सर्व कलाकारांचं कौतुक होत आहे.
View this post on Instagram
अक्षय खन्नाने ‘छावा’ सिनेमा मुघल सम्राट औरंगजेबाची भूमिका साकारून शोमध्ये धुमाकूळ घातला आहे. याचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. ‘छावा’ हा सिनेमा दिनेश विजनच्या मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली बनला आहे.
