AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: क्रूर औरंगजेबाने मुलीला जिवंत जाळलं! मराठमोळ्या स्टंट गर्लने शूट केलाय ‘छावा’मधील तो धडकी भरवणारा सीन

chhaava shocking scene: 'छावा' सिनेमामध्ये औरंगजेबाचा क्रूरपणा दाखवण्यात आला आहे. सोशल मीडियावर चित्रपटातील एक सीन चर्चेत आहे. या सीनमध्ये औरंगजेब एका मुलीला जीवंत जाळतो तो सीन कसा शूट करण्यात आला हे दाखवण्यात आले आहे.

Video: क्रूर औरंगजेबाने मुलीला जिवंत जाळलं! मराठमोळ्या स्टंट गर्लने शूट केलाय 'छावा'मधील तो धडकी भरवणारा सीन
Chhaava Movie Burning SceneImage Credit source: Social Media
| Updated on: Mar 11, 2025 | 5:44 PM
Share

सध्या सगळीकडे १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ सिनेमाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. सध्या सोशल मीडियावर या सिनेमातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये औरंगजेबाचा क्रूरपणा दाखवण्यात आला आहे. त्याने एका जिवंत मुलीला कसे जाळले हा सीन कसा शूट झाला हे दाखवण्यात आले आहे.

‘छावा’ या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे. तसेच औरंगजेब हा किती क्रूर होता हे दाखवले आहे. सोशल मीडियावर या चित्रपटातील अनेक सीन्सची चर्चा होती. आता सिनेमातील अंगावर काटे आणणाऱ्या सीनचा व्हिडीओ व्हायरल झाला हे. जो पाहून प्रेक्षकांचा थरकाप उडाला होता. हा सीन म्हणजे औरंगजेबाची सेना एका मुलीला जिवंत जाळते. हा सीन कसा शूट झाला हे व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे. या सीनमध्ये एका मराठी स्टंटगर्लने जीव धोक्यात घालून परफॉर्म केले आहे. या सीनचा BTS व्हिडिओ सोशल मीडियावर खळबळ उडवतोय.

वाचा: विक्की कौशलने हंबरडा फोडला… संपूर्ण सेट सुन्न होता; आशिष पाथोडेने सांगितला सेटवरील भावूक किस्सा

काय आहे नेमका सीन?

‘छावा’ सिनेमामध्ये औरंगजेब स्वराज्यावर हल्ला करण्यासाठी मोठ्या सैन्यासह निघताना दाखवण्यात आले आहे. दरम्यान, एक तरुणी मेंढ्या घेऊन रानात उभी असते. तेवढ्याच अचानत औरंगजेबाच्या सैन्याचे लक्ष जाते. ते त्या निर्दोष मुलीला जिवंत जाळतात. हा सीन पाहताना प्रेक्षकांचा अंगावर काटा आला असेल. हा सीन करणारी स्टंटगर्ल ही मराठी मुलगी, साक्षी सकपाळ आहे. तिने जीवाची पर्वा न करता हा सीन शूट केला आहे.

छावा सिनेमाविषयी

‘छावा’ चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर चित्रपटाचे दिग्दर्शन हे लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल दिसत आहे, त्यांची पत्नी येसुबाईंची भूमिका अभिनेत्री रश्मिका मंदानाने साकारली आहे तर औरंगजेब ही भूमिका अभिनेता अक्षय खन्नाने साकारली आहे. या चित्रपटात काही मराठी कलाकार देखील दिसले आहेत. त्यामध्ये संतोष जुवेकर, विनीत कुमार सिंह, अक्षय खन्ना आणि आशुतोष राणा यांचा समावेश आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...