AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vicky Kaushal : “आता आणखी काहीही नको…” लेक विहानबद्दल बोलताना भावुक झाला विकी कौशल

विकी कौशलने नुकतीच पालकत्वाच्या प्रवासावर मनमोकळेपणाने भाष्य केलं. वडील झाल्यावर विहान आणि कतरिनासोबतचा अनुभव जादुई असल्याचे त्याने सांगितलं.

Vicky Kaushal : “आता आणखी काहीही नको...” लेक विहानबद्दल बोलताना भावुक झाला विकी कौशल
| Updated on: Oct 02, 2026 | 7:23 PM
Share

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) सध्या पालकत्वाचा प्रवास एन्जॉय करतोय. साधारण वर्षभरापूर्वी तो बाबा बनला असून लाडक्या लेकासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. वडील झाल्यावर आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बराच बदलला आहे, असं तो म्हणाला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने पालकत्वाबद्दल खुलेपणाने भाष्य केलं. आई-बाबा बनल्यावर कतरिना आणि त्याचा अनुभव कसा होता, हेही त्याने सांगितलं.

गेल्या वर्षी, नोव्हेंबर 2025 मध्ये कतरिना कैफने मुलाला जन्म दिला. दोघांनी त्याचं नाव विहान ठेवलं, आता इतक्या काळाने विकीने पालकत्वावर भाष्य केलं असून हा जादुई अनुभव असल्याचं म्हटलं. कतरिना आणि विहानला एकत्र पाहिल्यावर खूप इमोशनल वाटतं असंही त्याने नमूद केलं.

काय म्हणाला विकी कौशल ?

हरीत जावेरी ज्वेलर्सच्या YouTube चॅनलला दिलेल्या मुलाखतीत विकी कौशलने वडील झाल्यानंतरच्या आपल्या अनुभवाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं. बाबा झाल्यानंतर आयुष्यात झालेल्या बदलांना शब्दांत व्यक्त करणं सोपं नसल्याचं तो म्हणाला. तो अनुभव इतका सुंदर, जादुई आहे की केवळ शब्दांत मांडणं कठीण आहे, असं विकीने म्हटलं.

यावेळी बोलताना विकीने मुलगा विहानच्या लहान-मोठ्या टप्प्यांबद्दलही सांगितलं. बाळाचं पहिल्यांदा हसणं, त्याचे नवे एक्सप्रेशन्स आणि वेगवेगळे हावभाव पाहणं हा त्याच्यासाठी अत्यंत खास अनुभव असल्याचं तो म्हणाला. गेल्या 10 महिन्यांत असे अनेक क्षण आले, जेव्हा त्याला वाटलं की, “ हीच आयुष्यातील संपूर्ण आनंदाची वेळ आहे आणि आता मला आणखी काहीही नको. ” – अशा शब्दांत त्याने आपला अनुभव मांडला.

कतरिनासोबत विहानला पाहून विकीला कसं वाटतं?

विकीने पत्नी कैटरीना कैफ आणि मुलगा विहानसोबत घालवलेल्या खास क्षणांचाही उल्लेख केला. पत्नीच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि मुलाचं हसू पाहताना तो क्षण तिथेच थांबावा आणि आपण तो आणखी काही वेळ अनुभवावा, असं वाटत असल्याचं त्याने सांगितलं.

आई-वडील झाल्यानंतर माणूस पूर्वीपेक्षा अधिक संवेदनशील होतो, असंही विकीने म्हटलं. त्याचबरोबर जबाबदारीची जाणीवही वाढते. आता केवळ आपल्या बोलण्याकडेच नाही, तर आपल्या कामाकडे आणि वागण्याकडेही अधिक काळजीपूर्वक पाहावं लागतं, असं त्याने सांगितलं.

विकी कौशलचं वर्कफ्रंट

दरम्यान, विकी कौशल लवकरच रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात दिसणार आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटातील तिघांचा पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला होता. त्यामुळे चित्रपटाबाबत चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. ‘लव्ह अँड वॉर’ हा चित्रपट 21 जानेवारी 2027 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा