AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: आंघोळ करताना नळ कसा बंद करायचा? महागुरुंचे ‘नळपुराण’, पाहा काय म्हणाले?

Video: सध्या सोशल मीडियावर अभिनेते सचिन पिळगावकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते बाथरुममधील नळ बंद करण्याविषयी बोलत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Video: आंघोळ करताना नळ कसा बंद करायचा? महागुरुंचे 'नळपुराण', पाहा काय म्हणाले?
Sachin PilgaonkarImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 01, 2025 | 4:50 PM
Share

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक म्हणून सचिन पिळगावकर ओळखले जातात. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेल्या काही दिवसांपासून सचिन पिळगावकर हे त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. सध्या सोशल मीडियावर महागुरुंचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते बाथरुममधील नळ बंद करण्याबाबत बोलताना दिसत आहेत. आता नेमकं काय झालं होतं? चला जाणून घेऊया…

सोशल मीडियावर सचिन पिळगावकर यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पण ही मुलाखत नेमकी कुठली आहे? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या मुलाखतीत सचिन पिळगावकर आंघोळ करताना आलेला अनुभव सांगताना दिसत आहेत. ‘धनंजय माने इथेच राहतात का?’ या फेसबुक अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

वाचा: आधी मेकॅनिक, टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम, नंतर थेट अंडरवर्ल्ड डॉन, अबू सालेमचा थरकाप उडवणारा प्रवास!

नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओमध्ये सचिन पिळगावकर म्हणतात, मी थंड पाण्याने आंघोळ करणारा माणूस आहे. त्यासाठी नळ सुरू करावा लागतो. मी बादली भरायला लावली. बादली भरताना वाटत पाहावी लागते. बादली भरल्यानंतर मी नळ बंद करण्याचा प्रयत्न करत होतो. पण नळ बंदच होत नव्हता. मी पॅनिक झालो. मग माझ्या लक्षात आलं की मी उलट्या दिशेने नळ बंद करतोय… नळ बंद होऊ शकणार नाही.. ते मला सुटल्या दिशेने बंद करायला हवा.

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

सध्या सोशल मीडियावर सचिन पिळगावकर यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. एका यूजरने बादली भरत असताना वाट पहावी लागते आणि नळ बंद होत नसल्यास कृपया पॅनिक होऊ नये. तेव्हा नळ कसा बंद करायचा हा मुद्दा आहे अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, महागुरू सध्याच्या पावसाळ्याची चावी सुद्धा कदाचित तुम्ही उलट्या दिशेने फिरवत आहात म्हणून नोव्हेंबर महिना लागला तरी पाऊस जात नाही अले म्हटले आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.