मुंबई: दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाने काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘लायगर’ या चित्रपटात त्याने अनन्या पांडेसोबत भूमिका साकारली. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. त्यानंतर आता विजय एका विशेष कारणामुळे चर्चेत आला आहे. विजयने नुकताच अवयवदानाला प्रोत्साहन देणाऱ्या एका कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमात तो अवयवदान या मुद्द्यावर मोकळेपणे बोलला. इतकंच नव्हे तर त्याने स्वत: अवयवदान करण्याचं जाहीर केलं.