रेखासोबत रिलेशनशिप, 2 बायका 1 मिस्ट्री गर्ल, प्रचंड रंगेल आहे विजय माल्याची लव्हलाईफ
Vijay Mallya love life: रेखा सोबत रिलेशनशिपपासून ते 23 वर्ष लहान मुलीसोबत प्रेमसंबंध, पार्ट्यांचा शोक असलेल्या विजय माल्याची प्रचंड रंगीत आहे लव्हलाईफ... गेल्या काही दिवसांपासून विजय माल्या तुफान चर्चेत आहे.

Vijay Mallya love life: एक काळ असा होता जेव्हा फरार उद्योजक विजय माल्या याची ओळख ‘किंग ऑफ गुड टाइम्स’ असं होतं. महागड्या गाड्या, पार्ट्या, बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत मैत्री, उद्योग क्षेत्रात मोठं नाव… भारतात प्रचंड रॉयल आयुष्य जगत होता विजय माल्या. रॉयल आयुष्यासह विजय माल्याची लव्हलाईफ देखील फार रंगीत आहे. विजय माल्या याला पहिलं प्रेम जमीनीपासून 30 हजार फूट उंचीवर झालं होतं.
1986 मध्ये, विजय मल्ल्या एका आंतरराष्ट्रीय विमान प्रवासादरम्यान एअर होस्टेस समैरा तैयबजीला भेटला. असं म्हटलं जातं की विजय माल्या पहिल्या नजरेत समैराच्या प्रेमात पडला. उड्डाणादरम्यान दोघांमधील संवाद वाढला आणि मल्ल्याने जमिनीपासून 30 हजार फूट उंचीवर हवेतच समैराला प्रपोज केलं.
1986 मध्ये दोघांनी लग्न देखील केलं. लग्नानंतर विजय आणि समैरा यांनी मुलगा सिद्धार्थ माल्या याला जन्म दिला. लग्नानंतर दोघांनी इंग्लंड याठिकाणी शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. पण मुलाच्या जन्मानंतर देखील दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर विजय माल्याचा पहिला संसार मोडला.
पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर विजय माल्याच्या आयुष्यात लहानपणीची मैत्रिण आणि क्रश रेखा हिची एन्ट्री झाली. पण रेखा तेव्हा विवाहित होती आणि दोन मुलांची आई देखील होती. असं असताना विजय आणि रेखा यांच्यामध्ये प्रेम बहरलं आणि 1993 मध्ये रेखा आणि विजय यांनी लग्न केलं. माल्याने रेखाच्या दोन मुलांना दत्तक देखील घेतलं.
विजय माल्या याने स्वतःचं दुसरं लग्न गुपित ठेवलं. दरम्यान, विजय आणि रेखा यांच्या नात्यात वादळ आल्याच्या चर्चांनी सर्वत्र जोर धरला. पण रेखा आणि विजय यांनी कधीच सर्वांसमोर नात्याचा स्वीकार केला नाही. माध्यमांपासून देखील विजय यांने दुसरं लग्न दूर ठेवलं.
दुसरा संसार मोडल्यानंतर विजय माल्या याला तिसऱ्यांदा प्रेम झालं. तिसऱ्यांदा विजय याला पिंकी लालवानी हिच्यासोबत प्रेम झालं. लालवानी ही बंद पडलेल्या विमान कंपनी किंगफिनिशर एअरलाइन्समध्ये एअर होस्टेस होती. पिंकी लालवानी ही मल्ल्यापेक्षा 23 वर्षांनी लहान असल्याची माहिती समोर येत आहे आणि तिला अनेकदा मल्ल्यासोबत स्पॉट केलं जातं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही लंडनमधील हर्टफोर्डशायर येथील मल्ल्याच्या आलिशान बंगल्यात एकत्र राहत आहेत. पण, मल्ल्याने या अफवांना दुजोरा किंवा नकार दिलेला नाही.
