AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मॅच फिक्सिंगपासून सेक्स रॅकेटपर्यंत… प्रसिद्ध अभिनेत्याच्या लडक्या मुलाचे प्रताप, आज जगतोय रॉयल आयुष्य

Bollywood Actor | प्रसिद्धी झोतात आल्यानंतर अभिनेत्याने ओलांडल्या सर्व मर्यादा... मॅच फिक्सिंगपासून सेक्स रॅकेटपर्यंत... अनेक प्रकरणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा... पण आज जगतोय रॉयल आयुष्य... सध्या सर्वत्र सेलिब्रिटींच्या आयुष्याची चर्चा...

मॅच फिक्सिंगपासून सेक्स रॅकेटपर्यंत... प्रसिद्ध अभिनेत्याच्या लडक्या मुलाचे प्रताप, आज जगतोय रॉयल आयुष्य
| Updated on: May 06, 2024 | 12:32 PM
Share

बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी प्रसिद्धी झोतात येण्यासाठी फार काळ लागला नाही. सिनेमे, अनेक शोंच्या माध्यमातून सेलिब्रिटी चर्चेत आले आणि चाहत्यांच्या मनावर त्यांनी राज्य केलं. अशाच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे अभिनेता विंदू दारा सिंग… विंदू दारा सिंग याने अनेक सिनेमे आणि शोमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण विंदू दारा सिंग त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिला. अनेक वादग्रस्त प्रकरणांसोबत अभिनेत्यांचं नाव जोडण्यात आलं.

विंदू दारा सिंग याचा जन्म 6 मे 1964 मध्ये झाला. विंदू दारा सिंग याचे वडील दारा सिंग होते. दारा सिंग यांनील देखील अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. विंदू दारा सिंग याने देखील चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण मॅच फिक्सिंगपासून सेक्स रॅकेटपर्यंत प्रकरणांमध्ये नाव आल्यानंतर अभिनेत्याची लोकप्रियता कमी झाली.

रिपोर्टनुसार, 2013 मध्ये विंदू दारा सिंग याचं नाव मॅच फिक्सिंगमध्ये समोर आलं. तेव्हा विंदू दारा सिंग याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी होती. अनेक सामन्यांमध्ये विंदू दारा सिंग क्रिकेटपटू धोनी याची पत्नी साक्षीसोबत दिसल्याने फिक्सिंगबाबतचा संशय अधिक गडद झाला. बुकी रमेश वोहरा याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी विंदू दारा सिंगलाही अटक केली होती. विंदूला त्याच्या घरातून अटक करण्यात आली.

सेक्स रॅकेटमध्ये विंदू दारा सिंग याचं नाव…

सेक्स रॅकेटमध्ये देखील विंदू दारा सिंग याचं नाव आलं होतं. विंदू दारा सिंगचेही आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटशी संबंध असल्याचा दावा 2013 मध्ये मुंबई पोलिसांनी केला होता. याप्रकरणी पोलिसांच्या हाती एक व्हिडीओ लागला होता. ज्यामध्ये ज्यामध्ये कझाकस्तानमधील काही मुली विंदू दारा सिंगसोबत दिसत होत्या आणि त्या व्हिसावर आल्या होत्या…

विंदू दारा सिंग याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘करण’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर 1996 मध्ये विंदू दारा सिंग याने पंजाबी सिनेविश्वात पदार्पण केलं. पण मोठ्या पडद्यावर स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर विंदू दारा सिंग याने छोट्या पडद्याकडे मोर्चा वळवला…

‘बिग बॉस 3’ मध्ये विंदू दारा सिंग याने स्पर्धक म्हणून एन्ट्री केली आणि विजय होऊन घराबाहेर आला… पण 2013 हे साल अभिनेत्यासाठी फार वाईट ठरला. 2013 मध्येच विंदू दारा सिंग याचं नाव मॅचफिक्सिंग आणि सेक्स रॅकेटमध्ये आलं. आता देखील अभिनेता कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अभिनेता आज रॉयल आयुष्य जगतो…

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.