जुही चावलाचा भाचा एका फोटोमुळे इंटरनेटवर बनला हिरो; नेटकरी म्हणाले हुबेहूब रणबीर कपूरच
अभिनेत्री जुही चावलाने तिच्या भाच्याचा वाढदिवसानिमित्त त्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. पण आता तो फोटो इतका व्हायरल झाला आहे की सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरु झाली आहे. नेटकऱ्यांनी त्याची तुलना रणबीर कपूरशी केली आहे. अनेकांनी तिचा भाचा हा रणबीरसारखा दिसतो असं म्हटलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाच्या भाच्याची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होताना दिसत आहे. जुहीने तिच्या भाच्याच्या वाढदिवसानिमित्त फोटो शेअर केला आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी त्याचा फोटो पाहून कमेंट करायला सुरुवात केली आहे. नेटकऱ्यांनी त्याला रणबीर म्हणण्यास सुरुवात केली आहे.
जुही चावलाच्या भाच्याची रणबीरशी तुलना
जुहीने तिचा भाचा वीर जय खोसलासोबतचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिने वीर जयच्या वाढदिवसानिमित्त 100 झाडे लावण्याची घोषणाही केली. तिच्या भाच्याचे फोटो समोर येताच प्रेक्षकांना त्याच्यात आणि रणबीर कपूरशी साम्य वाटले आहे.
जुही चावलाची इंस्टाग्राम पोस्ट
जुहीने मंगळवार, 28 ऑक्टोबर रोजी, जुही चावलाने तिचा भाचा जयसाठी वाढदिवसाची पोस्ट पोस्ट केली. तिने दोन फोटो एकत्र देऊन त्याला शुभेच्छा दिल्या. तिने अनेक इमोजी देखील जोडल्या आणि त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. तसेच तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की “माझ्या लाडक्या जयसाठी 100 झाडे लावणार आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा.”
View this post on Instagram
युजर्सच्या कमेंट्स
वीर जयचे फोटो पाहताच त्याच्या लूकची रणबीर कपूरशी तुलना सुरू झाली. एका युजरने कमेंट केली, ” हा अगदी रणबीर कपूरसारखा दिसतो.” दुसऱ्याने लिहिले, “पुढचा रणबीर कपूर तयार आहे.” अजून एका युजरने म्हटले, “वीर जय आता मोठा झाला आहे. त्याला आर्यन खानशी ओळख करून द्या आणि त्याला दिग्दर्शक बनवा.” तर अनेकांनी त्याला बॉलिवूडचा रणबीर कपूर असल्याचंच म्हटलं आहे. दुसऱ्याने लिहिले, “तो परदेशी दिसतो.” दुसऱ्याने लिहिले, “त्याचा चेहरा आणि वैशिष्ट्ये त्याच्या तरुणपणातील सनी देओलसारखी दिसतात.”
जुही चावलाची एकूण संपत्ती
जुही चावलाने 1995 मध्ये उद्योगपती जय मेहताशी लग्न केले. त्यांना जान्हवी मेहता आणि अर्जुन मेहता ही दोन मुले आहेत. या अभिनेत्रीने 1986 मध्ये “सुलतानत” या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर “कयामत से कयामत तक” या चित्रपटाने तिला एका रात्रीत स्टार बनवले. तिची एकूण संपत्ती अंदाजे 7.79 अब्ज असल्याचं म्हटलं जात आहे. ती शाहरुख खानसोबत आयपीएल टीम केकेआरची सह-मालकीण देखील आहे.
