Virat Kohli-Anushka Sharma: बापरे! विराट कोहली आणि अनुष्काने चक्क खाल्ला साप? थेट शेफनेच दिली माहिती… काय होती डिश वाचा?
Virat Kohli-Anushka Sharma Eat Vietnamese Dish: विराट आणि अनुष्का यांच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त (2019) सेलिब्रिटी शेफ हर्ष दीक्षित यांना एक खास जबाबदारी मिळाली होती. त्यांच्यासाठी एक वेगळा आणि संस्मरणीय पदार्थ तयार करण्याची. त्यावेळी त्यांनी या कपलसाठी सापांचा वापर करुन खाद्यपदार्थ बनवला होता. आता तो काय होता? जाणून घ्या...

भारतीय क्रिकेटचा दिग्गज विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना देशातील सर्वात लोकप्रिय, तसेच “पॉवर कपल” मानले जाते. दोघांचे लाखो चाहते आहेत आणि जेव्हा विराट मैदानावर असतो, तेव्हा अनुष्का स्टँडवरून त्याला पाठिंबा देताना दिसते. या कपलची हिच गोष्ट चाहत्यांसाठी खास आहे. ही जोडी 11 डिसेंबर 2017 रोजी विवाहबंधनात अडकली आणि तेव्हापासून त्यांची केमिस्ट्री लोकांसाठी एक आदर्श बनली आहे. तुम्हाला माहिती आहे का, विराट आणि अनुष्का यांच्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त (2019) सेलिब्रिटी शेफ हर्ष दीक्षित यांना एक खास जबाबदारी मिळाली होती. त्यांच्यासाठी एक वेगळा आणि संस्मरणीय पदार्थ तयार करण्याची. एका मुलाखतीत दीक्षित यांनी सांगितले की, त्यांनी व्हिएतनामी पदार्थ बनवला होता. त्यामध्ये सापाचा वापर केला होता.
कोणता पदार्थ होता?
दीक्षित म्हणाले की, ” विराट आणि अनुष्कासाठी फो हा पदार्थ बनवला होता. हा पदार्थ सामान्यतः बीफ किंवा चिकनच्या मटनाचा रस्सा वापरून बनवला जातो. पण विराट आणि अनुष्का त्या वेळी पूर्णपणे ग्लूटेन-फ्री आहारावर होते. त्यामुळे मी तांदळाच्या नूडल्ससह एक नवीन प्रयोग केला होता. व्हिएतनामी पदार्थांमध्ये सापाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. सापाची वाइन, सापाचे मांस देखील फोमध्ये असते. विराट अनुष्का आधीच शाकाहारी. त्यांना सापाचे मांस कसे द्याव?” शेफने यात सर्पगंधाचा वापर केला, जो शेंगदाणे, नारळ, टोफू आणि कोथिंबिरीसह स्मोक्ड करून वाढला गेला. तसेच, एनोकी मशरूम, सिंघाडा आणि मिरची यासारखे फ्लेवर्स लेमनग्रास-आलं रस्स्यासह वाढण्यात आला. हे सर्व काही विराटच्या जीवनशैली आणि चवीला अनुरूप तयार केले गेले होते.
2027 विश्वचषकापर्यंत कोहली आणि रोहित खेळू शकतील का?
दरम्यान, क्रिकेट चाहत्यांमध्ये हा प्रश्नही उपस्थित होत आहे की, विराट कोहली (36) आणि रोहित शर्मा (38) 50 षटकांच्या पुढील विश्वचषकापर्यंत (2027) भारतीय संघाचा भाग राहतील की नाही. येत्या काही महिन्यांत भारताला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका खेळायच्या आहेत, त्यानंतर जानेवारी ते जुलै 2026 पर्यंत इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध आणखी 6 वनडे सामने होतील. मात्र, हे काही मर्यादित सामने दोन वर्षांनंतर होणाऱ्या विश्वचषकाच्या तयारीसाठी पुरेसे ठरतील का? आणि कोहली-रोहित केवळ एका फॉरमॅटवर आणि आयपीएलच्या जोरावर इतक्या काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टिकू शकतील का?
एक क्रिकेट सूत्रानुसार, “यावर लवकरच गंभीर चर्चा व्हायला हवी. 2027 विश्वचषकाला अजून वेळ आहे, पण तोपर्यंत दोन्ही खेळाडू 40 वर्षांचे होतील. संघ व्यवस्थापनाला याबाबत स्पष्ट रणनीती आखावी लागेल. तसेच, युवा खेळाडूंनाही संधी देण्याची गरज आहे, जेणेकरून वेळेत संतुलित संघ तयार होऊ शकेल.”
