AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसन्न आहात ना?…प्रेमानंद महाराजांनी विचारताच अनुष्का झाली भावूक अन् रडू लागली,पाहा व्हिडीओ

विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने आणि अनुष्का शर्माने प्रेमानंद महाराजांना भेट दिली. भेटीदरम्यान महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिले. अनुष्का महाराजांच्या शिकवणीने भावूक झाली आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले. हे प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कोहली-अनुष्का यांचा प्रेमानंद महाराजांवर खूप विश्वास आहे. ते नेहमीच त्यांच्या आश्रमाला भेट देत असतात.

प्रसन्न आहात ना?...प्रेमानंद महाराजांनी विचारताच अनुष्का झाली भावूक अन् रडू लागली,पाहा व्हिडीओ
anushka and viratImage Credit source: TV9 Marathi
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: May 13, 2025 | 8:19 PM
Share

कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर एका दिवसानंतर, विराट कोहली त्याची पत्नी अनुष्का शर्मासह प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात त्यांचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले. दोघांचाही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी जेव्हा कोहलीचे काही कारणास्तव अडचणी सुरु होत्या तेव्हा तो प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात येऊन भेट देऊन गेला होता आणि त्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शानदार फलंदाजी करून भारताला चॅम्पियन बनवले. विराट आणि अनुष्का हे प्रेमानंद महाराजांचे भक्त आहेत.ते त्यांना खूप मानतात. त्यामुळे ते नेहमीच त्यांच्या आश्रमाला भेट देत असतात.

अनुष्काच्या डोळ्यातही पाणी आलेलं

आता पुन्हा एकदा कोहली आणि अनुष्काने आश्रमाला भेट दिली. यावेळी, कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, कोहलीने प्रेमानंद महाराजांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले. हे होघेही जेव्हा प्रेमानंद महाराजांना भेटले तेव्हा महाराजांनी त्यांना दोघांना प्रश्न विचारला की, तुम्ही आनंदी आहात का? तेव्हा विराट कोहलीने होकारार्थी उत्तर दिलं. त्याच वेळी अनुष्काच्या डोळ्यातही पाणी आलेलं दिसलं. महाराजांनी कोहली आणि अनुष्कासोबत बराच वेळ गप्पा मारल्या. दोघेही महाराजांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत होते. प्रेमानंद महाराजांना भेटल्यानंतर कोहली आणि अनुष्का खूप आनंदी दिसत होती तसेच तिच्या डोळ्यात शेवटपर्यंत पाणी होते. ती महाराजांची शिकवण ऐकून भावूकही झाली होती. दोघांच्याही चेहऱ्यावर समाधानाचे भाव स्पष्ट दिसत होते. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा श्री राधाकेलीकुंज आश्रमात सुमारे तीन तास थांबले होते.

विराट आणि अनुष्काच्या हातातील इलेक्ट्रॉनिक अंगठीने लक्ष वेधलं

दरम्यान प्रेमानंद महाराजांच्या भेटीदरम्यान अनुष्काने काळा-पांढरा रंगाचा साधा सूट घातला होता, तर विराटने फॉर्मल पँट-शर्ट. या भेटीदरम्यान सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते विराट आणि अनुष्काच्या हातातील इलेक्ट्रॉनिक अंगठीने. ही इलेक्ट्रॉनिक अंगठी नेमकी जपाची अंगठी म्हणूनही ओळखली जाते. म्हणजे ज्यांना प्रवासात जपमाळ घेऊन जाणं शक्य नसंत ते ही अंगठी वापरतात. त्यावर तुम्ही जप कराल तसे ते मोजले जाते.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान