AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विशाल ददलानींना इतिहास माहित नाही? ट्विटरवर सालटं का काढतायत लोक?

गायक-संगीतकार विशाल दादलानी (Vishal Dadlani) हे ‘इंडियन आयडॉल’ (Indian Idol)  शोमध्ये जज्‌ आहेत.

विशाल ददलानींना इतिहास माहित नाही? ट्विटरवर सालटं का काढतायत लोक?
| Updated on: Jan 25, 2021 | 10:56 AM
Share

मुंबई : गायक-संगीतकार विशाल ददलानी (Vishal Dadlani) हे ‘इंडियन आयडॉल’ (Indian Idol)  शोमध्ये जज्‌ आहेत. शोमध्ये एका स्पर्धकाने ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे गाणे सादर केले होते. त्यावेळी गाण्याचे काैतुक करत विशाल ददलानी यांनी हे गाणे कधी गायले होते आणि त्या गाण्याचा नेमका इतिहास काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यावेळी ते म्हणाले की, लता मंगेशकर यांनी हे गाणे 1947 मध्ये पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर गायले होते.(Vishal Dadlani Twitter Troll)

त्यानंतर ट्विटरवर आणि सोशल मीडियावर त्यांना टिकेला सामोरे जावे लागत आहे. काही जणांनी त्यांना इतिहास बघण्याचा सल्ला दिला आहे तर काहीजण त्यांना राजकारणी देखील म्हणत आहेत. ऐवढे नाहीतर काही जणांनी सोनी टिव्हीला अशा मानसाला तुमच्या चॅनलच्या शोमधून काढून टाका असा सल्ला देखील दिला आहे. प्रत्येक स्तरातून त्यांच्यावर आता टिका होताना दिसत आहे.

कारण हे गाणे 1962 मध्ये भारत-चीन युद्धादरम्यान शहिद झालेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ लता मंगेशकर यांनी गायलेले ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे गाणे कविवर्य प्रदीप यांनी हिंदीमध्ये लिहिलेले देशभक्तीपर गीत आहे. लता मंगेशकर यांनी हे गाणे प्रथम प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी 1963 ला नवी दिल्ली येथे गायले होते. या सर्व प्रकरणानंतर मात्र, विशाल दादलानी ट्विटरवर हॅशटॅग ट्रेंडिंगवर आले आहेत. या सर्व प्रकरणावर आता विशाल दादलानी यांनी दिलगीरी व्यक्त करत सर्वांची माफी मागितली आहे.

संबंधित बातम्या : 

Varun-Natasha Wedding | वरुण नताशाचं लग्न, सोशल मीडियावर मिम्सची लाट!

The Kapil Sharma Show | चाहत्यांसाठी मोठा धक्का, कपिल शर्माचा शो बंद होणार?

(Vishal Dadlani Twitter Troll)

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...