AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्याशी ब्रेकअपनंतर अरेंज मॅरेज करताना विवेकने आईसमोर ठेवली ‘ही’ अट

प्रियांका आणि विवेकने 29 ऑक्टोबर 2010 मध्ये बेंगळुरूमध्ये लग्न केलं. या दोघांना वियान वीर आणि अमायरा निर्वाणा ही दोन मुलं आहेत. विवेक नुकताच रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलीस फोर्स' या वेब सीरिजमध्ये झळकला होता.

ऐश्वर्याशी ब्रेकअपनंतर अरेंज मॅरेज करताना विवेकने आईसमोर ठेवली 'ही' अट
ऐश्वर्याशी ब्रेकअपनंतर विवेकने मंत्र्याच्या मुलीशी केलं लग्नImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 11, 2024 | 10:51 AM
Share

मुंबई: 11 मार्च 2024 | अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉय यांचं अफेअर जगजाहीर होतं. मात्र या दोघांच्या नात्याचा शेवट गोड होऊ शकला नाही. ब्रेकअपनंतर विवेकला दुसरं कोणाशीच लग्न करायचं नव्हतं. मात्र फ्लोरेन्समधील त्या एका संध्याकाळने सर्वकाही बदललं आणि तिथेच विवेक त्याची भावी पत्नी प्रियांका अल्वाला भेटला. पहिल्या भेटीच्या 48 तासांत प्रियांकाच आपली आयुष्यभराची जोडीदार होईल, याचा निर्णय विवेकने घेतला होता. ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत विवेकने त्याच्या लग्नाची गोष्ट सांगितली. आयुष्यातील सर्वांत वाईट हृदयभंग अनुभवल्यानंतर विवेकला पुन्हा त्याच्याजवळ कोणालाच येऊ द्यायचं नव्हतं. मात्र प्रियांकाचा फोटो पाहिल्यानंतर त्याच्यासाठी सर्वकाही बदललं.

“माझी मावशी प्रियांकाच्या मावशीला भेटली होती. तुमची भाची आणि माझा भाचा यांची जोडी परफेक्ट होऊ शकते, असं त्या म्हणाल्या. त्यावेळी प्रियांका न्यूयॉर्कमध्ये एमबीएचं शिक्षण घेत होती. तिच्या नातेवाईकांनीच हे स्थळ आणलं होतं. माझ्या आईने हे पाहिलं आणि त्याआधी तिने मला अनेकदा नकार देताना ऐकलं होतं. मला याबद्दल काहीच बोलायचं नाही, असं म्हणून मी लग्नाची गोष्ट टाळायचो. प्रियांकाचा फोटो घरी आणल्यानंतर आई म्हणाली की ती खरंच सुंदर आहे. तू तिला एकदा भेटून बघ, अशी विनंती तिने माझ्याकडे केली”, असं विवेकने सांगितलं.

पुढे विवेक म्हणाला, “मी तिच्याशी डील केली होती. मी तिला म्हणालो, मी जाऊन या मुलीला भेटीन पण एका अटीवर. यानंतर तू हे सर्व थांबवशील असं मला वचन दे. त्यावर आई म्हणाली, ओके डन.” जेव्हा विवेकने तिला भेटायला होकार दिला, तेव्हा प्रियांका इटलीतील फ्लॉरेन्स या ठिकाणी कुटुंबीयांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत होती. प्रियांकाला फक्त भेटून मुंबईला परत यायचं असं विवेकने ठरवलं होतं. कारण त्या क्षणीही तो कोणाशीच लग्न करण्यास तयार नव्हता. मात्र नियतीला काही वेगळंच मान्य होतं.

View this post on Instagram

A post shared by Vivek Oberoi (@vivekoberoi)

प्रियांकासोबतच्या पहिल्या भेटीविषयी विवेकने सांगितलं, “मी एका कॅफेमध्ये होतो आणि एका मुलीला माझ्याकडे येताना पाहिलं. सर्वांत पहिली गोष्ट माझ्या निदर्शनास आली ती म्हणजे तिने फ्लॅट चप्पल घातले होते, साधी लिननची पँट आणि त्यावर साधा टॉप परिधान केला होता. तिचे केस हलकेसे बांधले होते आणि तिने कोणताच मेकअप केला नव्हता. तिला पाहून मी मनात म्हटलं, वाह आत्मविश्वासाला मानलं पाहिजे. ती माझ्यासमोर येऊन बसली आणि म्हणाली, हाय माफ कर, मला दहा मिनिटे उशिर झाला आहे.”

पहिल्याच भेटीत विवेक आणि प्रियांका यांची चांगली मैत्री झाली आणि ते तासनतान एकमेकांशी गप्पा मारू लागले होते. विवेक प्रियांकासोबतच्या गप्पांमध्ये इतका रमला होता की त्याची भारतात येणारी फ्लाइटसुद्धा चुकली होती. भेटीनंतर प्रियांकाने तिच्या हॉटेलपर्यंत सोडलं आणि त्याठिकाणी तो तिच्या कुटुंबीयांशी भेटला. दुसऱ्या दिवशी विवेकने प्रियांकाला इंम्प्रेस करण्यासाठी ‘बॉलिवूड कार्ड’चा वापर केला.

“दुसऱ्या दिवशी मी कन्वर्टीबल (आलिशान कार) भाड्याने घेतली. चांगला जॅकेट परिधान करून सकाळी 11 वाजता तिला भेटायला गेलो. मला अशा अंदाजात बघून तिला आश्चर्याचा धक्काच बसला होता. आम्ही दोघं ड्राइव्हला गेलो आणि संपूर्ण दिवस एकमेकांसोबत घालवला. त्यानंतर काय झालं मलाच माहीत नाही. दिवसाअखेर मी तिला घरी सोडताना म्हटलं की, हे बघ तू मुलगी आहेस, त्यामुळे होकार किंवा नकार देण्याचा खास अधिकार तुला आहे. पण मी माझ्या लग्नात जर कधी लग्न करण्याचा निर्णय घेतला, तर तो तुझ्याशीच करेन. जर मी तुझ्याशी लग्न केलं नाही तर कोणाशीच करणार नाही. बाकी तुझा निर्णय आहे. तू तुझा वेळ घे आणि मला कळव”, असं विवेकने सांगितलं.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.