Vivek Oberoi गडगंज संपत्तीचा मालक, कोणता व्यवसाय करतो? म्हणतो, येणाऱ्या अनेक पिढ्या बसून खातील…
Vivek Oberoi : सिनेमात काम नाही, तरीही कोट्यावधींची माया कमावतो विवेक ओबेरॉय, एवढं कमावून ठेवलंय की म्हणतो, 'येणाऱ्या अनेत पिढ्या बसून खातील...', सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या कमाईची चर्चा...

Vivek Oberoi : अभिनेता विवेक ओबेरॉय आता सिनेमांमध्ये सक्रिय नसला तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो… फार लहान वयात विवेक याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण अभिनेत्याने स्वतःला फक्त अभिनयापर्यंत मर्यादित ठेवलं नाही. तर विवेक याने व्यवसात देखील स्वतःचं नाव मोठं केलं आहे. गेल्या काही वर्षात विवेक याच्या उद्योगाचा टर्नओव्हर 1200 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. रिपोर्टमध्ये असं देखील म्हटलं जात आहे की, विवेक आता पडद्यावर कमी दिसत असला तरी पैसे कमविण्याच्या बाबतीत तो अनेक मोठ्या कलाकारांना मागे टाकतो.
वयाच्या 16 व्या वर्षी कमावले 1 कोटी…
विवेक ओबेरॉय लवकरच ‘मस्ती 4’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आाहे.. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान, अभिनेत्याला ‘तू खरंत 1200 कोटी रुपयांचा मालक आहेस?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर विवेक म्हणाला, ‘जेव्हा मी 15 वर्षांचा होतो.. तेव्हापासूनत मी आत्मनिर्भर आहे.. जेव्हा मी 16 – 17 वर्षांचा झालो तेव्ही मी 1 कोटी कमावले होते…’
‘मला ट्रेडिंग करायला फार आवडतं… सुरुवातीपासून मला माहिती होती ती, पैशांची बचत कशी करायची. कॅशमध्ये कधीच बचत करायची नाही. तर स्टॉक व्हॅल्यूमध्ये पैशांची बचत करायची.. त्यानंतर मी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, त्यानंतर मला कळलं की व्यवसाय आणि स्टॉक मार्केट कोणत्या पद्धतीने काम करतं…’ सांगायचं झालं तर, वयाच्या 19 व्या वर्षी विवेक याने पहिला व्यवसाय सुरु केला. तेव्हा अभिनेत्याने 12 कोटी रुपये कमावले होते… तर त्या व्यवसायात विवेक याने फक्त 20 – 25 लाख रुपपयांची गुंतवणूक केली होती.
‘माझ्या व्यवसायातून अनेकांनी नफा कमावला… मी कायम गुंतवणूकदारांचा विचार केला… त्यानंतर मी स्वतःच्या एका नव्या कंपनीची स्थापना केली… त्यानंतर एक आणि त्यानंतर पुन्हा एक… वेगवेगळ्या प्रकारे मी गुंतवणूक केली आहे… आज माझ्या 5 कंपन्या आहे आणि प्रत्येक कंपनी नफा मिळवून देत आहे… मी रोज 16 तास काम करतो… शूटमध्ये व्यस्त असली तरी, मी माझं जास्त लक्ष व्यवसायाकडे असतं…’
विवेक ओबेरॉय याची नेटवर्थ?
नुकताट झालेल्या एका मुलाखतीत विवेक म्हणाला, ‘माझी नेटवर्थ किती आहे याने काय फरक पडतो… दिवसाच्या अखेरीस माझ्याकडे गाडी आहे… माझं घर आहे आणि मला जे हवं आहे ते मी खरेदी करु शकतो… देवाने मला इतकं दिलं आहे की, माझ्या निधनानंतर किती पिढ्या फक्त बसून खातील आणि पैसा त्यांची काळजी घेईल हे मला माहित नाही.’
