AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेटवर वॉशरुम नसल्याने या अभिनेत्रीने लढवलेली अनोखी शक्कल, ऐकून व्हाल हैराण

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील धक्कादायक किस्सा. 60 च्या दशकातील चित्रपटाच्या शूटिंगच्या सेटवर वॉशरुम नसल्यामुळे या अभिनेत्रीने पाणी पिणं केलं होतं बंद. चित्रपट ठरला होता ब्लॉकबस्टर.

सेटवर वॉशरुम नसल्याने या अभिनेत्रीने लढवलेली अनोखी शक्कल, ऐकून व्हाल हैराण
| Updated on: Apr 27, 2026 | 1:32 PM
Share

Bollywood Actress : बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना शूटिंगच्या वेळी किंवा चित्रपटांच्या वेळी अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. असाच एक किस्सा सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. अभिनेत्री वहीदा रहमान यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळातील एक अतिशय रंजक आणि आश्चर्यकारक अनुभव नुकताच उघड केला आहे. लोकप्रिय टीव्ही शो द कपिल शर्मा शो मध्ये सहभागी होत त्यांनी मुगल-ए-आझम या ऐतिहासिक चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेला किस्सा प्रेक्षकांसमोर मांडला.

वहीदा रहमान यांनी सांगितले की, त्या काळात मोहन स्टुडिओमध्ये शूटिंग सुरू असताना सेटवर वॉशरूमची कोणतीही सुविधा नव्हती. इतक्या मोठ्या आणि भव्य चित्रपटाचे शूटिंग सुरू असूनही कलाकारांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या ही बाब धक्कादायक होती. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी दिवंगत अभिनेते महमूद यांच्यासोबत स्टुडिओ मालकांशी चर्चा केली. दोघांनी मिळून काही पैसे देत वॉशरूमची व्यवस्था करून देण्याची विनंती केली.

वॉशरुम नसल्याने अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय

त्यानंतर काही दिवसांनी जेव्हा ते पुढील शेड्यूलसाठी परत आले, तेव्हा त्यांनी उत्सुकतेने वॉशरूम तयार झाल्याबद्दल विचारले. स्टुडिओ व्यवस्थापनाने होकार दिला, मात्र प्रत्यक्षात जे पाहायला मिळाले ते पूर्णपणे अनपेक्षित होते. योग्य शौचालय उभारण्याऐवजी स्टुडिओच्या कॉरिडॉरमध्ये थंडर बॉक्स’ ठेवण्यात आला होता, ज्याचा वापर तात्पुरत्या बाथरूमसारखा केला जात होता. ही व्यवस्था पाहून वहीदा रहमान आणि इतर कलाकार अक्षरशः थक्क झाले.

या असुविधेमुळे त्या काळातील शूटिंग किती कठीण होतं, याची कल्पना येते. वहीदा रहमान यांनी सांगितले की, वॉशरूम नसल्यामुळे कलाकारांनी पाणी पिणेसुद्धा कमी केले होते, जेणेकरून वारंवार अडचण येऊ नये.

मुगल-ए-आझम हिट चित्रपट

दरम्यान, मुगल-ए-आझम हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मैलाचा दगड मानला जातो. या चित्रपटात पृथ्वीराज कपूर यांनी सम्राट अकबर, दिलीप कुमार यांनी राजकुमार सलीम आणि मधुबाला यांनी अनारकलीची भूमिका साकारली होती. सलीम आणि अनारकली यांच्या प्रेमकथेवर आधारित या चित्रपटात सम्राट अकबर यांच्या विरोधामुळे पिता-पुत्रामध्ये संघर्ष उभा राहतो.

वहीदा रहमान यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्यांनी 1955 मध्ये तेलुगू चित्रपट रोजुलु मरायी मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर प्यासा, कागज के फूल, चौदहवीं का चांद आणि साहिब बीबी आणि गुलाम यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांतून त्यांनी मोठी लोकप्रियता मिळवली.

Follow Us
राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत नेमकं कोण जाणार? मोठी अपडेट समोर
राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत नेमकं कोण जाणार? मोठी अपडेट समोर.
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणुकीच्या मैदानाबाहेर?
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणुकीच्या मैदानाबाहेर?.
भारतात लव्ह जिहाद... शिवरायांबाबतच्या वक्तव्यानंतर बागेश्वर बाबाचं...
भारतात लव्ह जिहाद... शिवरायांबाबतच्या वक्तव्यानंतर बागेश्वर बाबाचं....
कोल्हापुरात आंदोलन पेटलं; बिंदू चौकात पोलिस-आंदोलकांमध्ये झटापट
कोल्हापुरात आंदोलन पेटलं; बिंदू चौकात पोलिस-आंदोलकांमध्ये झटापट.
माझ्या मर्जीशिवायच... अमरावती प्रकरणात मोठा ट्विस्ट, अयान विरोधात...
माझ्या मर्जीशिवायच... अमरावती प्रकरणात मोठा ट्विस्ट, अयान विरोधात....
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; परदेशी समितीचा अहवाल सादर, सरकारची घोषणा...
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; परदेशी समितीचा अहवाल सादर, सरकारची घोषणा....
सर्वांचे पेढे खा, आमच्याच पेढ्यावर लक्ष का? संजय राऊतांचा मिश्किल टोला
सर्वांचे पेढे खा, आमच्याच पेढ्यावर लक्ष का? संजय राऊतांचा मिश्किल टोला.
मोठी बातमी! शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी एक नाव जवळपास निश्चित, मात्र..
मोठी बातमी! शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी एक नाव जवळपास निश्चित, मात्र...
थेट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना केजरीवालांचं पत्र
थेट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना केजरीवालांचं पत्र.
मतदारांवर दबाव आणण्यासाठी... बंगाल निवडणुकीबाबत राऊतांचं मोठं विधान
मतदारांवर दबाव आणण्यासाठी... बंगाल निवडणुकीबाबत राऊतांचं मोठं विधान.