tv9 Marathi Special Report | शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; प्रवीण परदेशी समितीचा अहवाल सादर, सरकारची मोठी घोषणा काय?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी कर्जमाफी योजना लवकरच लागू होण्याची शक्यता आहे. कर्जमाफी संदर्भातील प्रवीण परदेशी समितीचा अहवाल सरकारला प्राप्त झाला असून, पुढील दोन महिन्यांत या निर्णयावर अंमलबजावणी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 2 लाख रुपयांपर्यंतची थकीत कर्जमाफी जाहीर करण्यात येणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी कर्जमाफी योजना लवकरच लागू होण्याची शक्यता आहे. कर्जमाफी संदर्भातील प्रवीण परदेशी समितीचा अहवाल सरकारला प्राप्त झाला असून, पुढील दोन महिन्यांत या निर्णयावर अंमलबजावणी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 2 लाख रुपयांपर्यंतची थकीत कर्जमाफी जाहीर करण्यात येणार आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे थकीत कर्ज या योजनेत समाविष्ट असेल. याशिवाय, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ सुमारे 35 लाख शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर रकमेकरिता एकूण 27 ते 30 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी समितीने काही तातडीच्या तसेच दीर्घकालीन उपाययोजनाही सुचवल्या आहेत. सरकारकडून जून महिन्यापर्यंत कर्जमाफीची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; परदेशी समितीचा अहवाल सादर, सरकारची घोषणा...
सर्वांचे पेढे खा, आमच्याच पेढ्यावर लक्ष का? संजय राऊतांचा मिश्किल टोला
मोठी बातमी! शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी एक नाव जवळपास निश्चित, मात्र..
थेट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना केजरीवालांचं पत्र

