AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP: कॉकरोच जनता पार्टी राजकीय पक्ष का होऊ शकत नाही? नेमकं कारण काय? समजून घ्या

Cockroach Janta Party: कॉकरोच जनता पार्टीने गेल्या काही दिवसात आपली ताकद दाखवून दिली आहे. देशभरात आंदोलन उभं करून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन दाखवला. पण आपलं अस्तित्व दाखवलेल्या कॉकरोच जनता पार्टीचं राजकीय भविष्य काय? असा प्रश्न पडतो. कॉकरोच जनता पार्टी राजकीय पक्ष होऊ शकत नाही, असंही सांगितलं जात आहे. चला जाणून घेऊयात कारण...

CJP: कॉकरोच जनता पार्टी राजकीय पक्ष का होऊ शकत नाही? नेमकं कारण काय? समजून घ्या
CJP: कॉकरोच जनता पार्टी राजकीय पक्ष का होऊ शकत नाही? नेमकं कारण काय? समजून घ्याImage Credit source: TV9 Network/File
| Updated on: Jul 27, 2026 | 5:22 PM
Share

कॉकरोच जनता पार्टीने अल्पावधीतच आपलं अस्तित्व दाखवून दिलं आहे. ज्या जेन झीला कॉकरोच म्हणून हिणवलं गेलं, त्या जेन झीने कॉकरोच जनता पार्टीच्या व्यासपीठावरून केंद्र सरकारला दणका दिला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. हाच मुद्दा पकडून कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीच्या जंतरमंतरवर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी रान पेटवलं. अभिजीत दिपकेच्या नेतृत्वात 6 जून 2026 रोजी जंतरमंतरवर प्रत्यक्ष आंदोलनाला सुरूवात झाली. हे आंदोलन 37 दिवस चाललं. या दरम्यान 20 जुलैला आंदोलकांनी संसद चलो मोर्चा काढला आणि त्यात तणाव निर्माण झाला होता. यात विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली. त्यानंतर हा वणवा संपूर्ण देशात पेटला आणि सरकारला झुकावं लागलं. 25 जुलैला धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन मागे घेतल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं. आंदोलनाला यश मिळाल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचं भविष्य काय? राजकीय पक्ष म्हणून पुढे येऊ शकतो का? असे एक ना अनेक प्रश्न आहेत.

सोशल मिडिया ते एक संघटना

कॉकरोच जनता पार्टी हा काय मान्यता प्राप्त किंवा नोंदणीकृत राजकीय पक्ष नाही. मे 2026 मध्ये सर्वोच्च न्यायालयात एका सुनावणीदरम्यान झालेल्या टिप्पणीनंतर कॉकरोच जनता पार्टी उदयास आली. सुरूवातीला एक प्रतिकात्मक आणि उपहासात्मक ऑनलाइन मोहीम म्हणून याकडे पाहिलं गेलं. अभिजीत दिपके याने ही मोहिम सुरू केली होती. पण रातोरात या एका व्यासपीठावर देशभरातील असंतुष्ट तरूण एकत्र आले. कॉकरोच जनता पार्टीचं सदस्य होण्यासाठी इंस्टाग्राम आणि इतर सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर तरूणांची रिघ लागली. तरूणांनी या व्यासपीठावरून मीम्स शेअर करून मनातील असंतोष व्यक्त केला. या माध्यमातून सत्ताधारी पक्षाविरोधात असंतुष्ट तरूणांना एक व्यासपीठच मिळालं. त्यानंतर सोशल मीडियावरील ही संघटना मैदानात उतरली.

कॉकरोच जनता पार्टी राजकीय पक्ष होऊ शकत नाही?

भारतात राजकीय पक्ष म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी नवीन संघटनेला भारतीय निवडणूक आयोगाकडे नोंदणी करणं आवश्यक असतं. पण कॉकरोच जनता पार्टीने अशी कोणतीही नोंदणी केलेली नाही. दुसरं नोंदणी केली तर निवडणूक आयोगाचे काही कठोर नियम आहेत. निवडणूक चिन्ह आदेश 1968 मध्ये कोणत्याही नवीन राजकीय पक्षाला कोणताही प्राणी किंवा पक्षी आपलं अधिकृत निवडणूक चिन्ह वापरण्यास सक्त मनाई आहे. कायद्यातील या कठोर तरतुदीमुळे कॉकरोच जनता पार्टीला झुरळ हे चिन्ह मिळणं अशक्य आहे. त्यामुळे भविष्यात कॉकरोच जनता पार्टीने निवडणूक लढवण्यासाठी नोंदणी केली तर चिन्ह बदलणं भाग आहे.

राजकीय पक्ष स्थापनेची प्रक्रिया

कॉकरोच जनता पार्टीने जनआंदोलन उभं केलं आणि त्याला तरूणाईचा प्रचंड पाठिंबा लाभला. पण इतक्यावरच राजकीय पक्ष उभारता येत नाही. त्यासाठी संविधानाच्या चौकटीत उभं राहून काम करावं लागतं. व्यापक सदस्य नोंदणी मोहीम राबवावी लागते. पक्षाची घटना, पदाधिकाऱ्यांची निवड करावी लागते. कॉकरोच जनता पार्टीचं तसं काही धोरण सध्यातरी दिसत नाही. त्यामुळे पक्ष बांधणी करताना बऱ्याच अडचणी आहेत. इतकंच काय आर्थिक पारदर्शकताही महत्त्वाची आहे. बँक खात्याच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला नियमित अहवाल सादर करणे हा देखील प्रक्रियेचा भाग आहे. सध्या कॉकरोच जनता पार्टी या प्रक्रियेचा भाग नाही. फक्त डिजिजल माध्यमातून पक्ष उभा करणं सोपं नाही. त्यासाठी प्रत्यक्ष जमिनीवर काम होणं आवश्यक आहे.

Follow Us
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेच्या त्या फोन कॉलची तुफान चर्चा, video
Abhijit Dipake | आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेच्या त्या फोन कॉलची तुफान चर्चा, व्हिडीओ पहाच
CJP ची इन्साईड पार्टी, Video होतोय व्हायरल! सोशल मीडियावर नवा वाद
CJP ची इन्साईड पार्टी, Video होतोय व्हायरल! तजिंदर बग्गांचा गंभीर आरोप; सोशल मीडियावर नवा वाद
एकटीने पोलिसांची व्हॅन रोखणाऱ्या रिया अहिरबाबत मोठी अपडेट समोर, आक्षेप
एकटीने पोलिसांची व्हॅन रोखणाऱ्या रिया अहिरबाबत मोठी अपडेट समोर, आक्षेपार्ह...