Video: रिचा-अलीचा जबरदस्त डान्स; संगीत कार्यक्रमात रोमँटिक केमिस्ट्रीचा तडका

'अंबरसरियाँ' गाण्यावर रिचा-अलीचा खास डान्स; पहा Video

Video: रिचा-अलीचा जबरदस्त डान्स; संगीत कार्यक्रमात रोमँटिक केमिस्ट्रीचा तडका
Richa Chadha and Ali FazalImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 03, 2022 | 6:11 PM

अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chadha) आणि अली फजल (Ali Fazal) अवघ्या काही दिवसांत लग्नबंधनात अडकणार आहेत. सध्या दिल्लीमध्ये रिचा आणि अलीचे लग्नापूर्वीचे कार्यक्रम पार पडत आहेत. मेहंदी आणि संगीत (Sangeet) कार्यक्रमाचे फोटो रिचाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. आता संगीत कार्यक्रमातील या दोघांच्या डान्सचा व्हिडीओ समोर आला आहे. ‘रांझा रांझा’ आणि ‘अंबरसरियाँ’ यांसारख्या बॉलिवूड गाण्यांवर या दोघांनी ठेका धरला. शुक्रवारी रिचा-अलीने कॉकटेल पार्टीचं आयोजन केलं होतं.

संगीत कार्यक्रमात रिचा-अलीने ‘रावण’ या चित्रपटातील ‘रांझा रांझा’ गाण्यापासून नाचण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी फुकरेमधील लोकप्रिय ‘अंबरसरियाँ’ गाण्यावर डान्स केला. मेहंदी आणि संगीत कार्यक्रमात रिचाने पेस्टल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. तर अलीने पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा आणि त्यावर शॉल परिधान केला होता.

हे सुद्धा वाचा

रिचा आणि अलीच्या लग्नाविषयी छोट्यातली छोटी गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्यांच्या लग्नाच्या मेन्यूमध्ये प्रसिद्ध राजौरी गार्डनचे छोले भटुरे आणि नटराजचा चाट यांचा समावेश असणार आहे. रिचाचा जन्म अमृतसरमध्ये झाला तर दिल्लीमध्ये ती लहानाची मोठी झाली. त्यामुळे दिल्ली शहराशी तिचं खास कनेक्शन आहे.

रिचा आणि अली येत्या 6 ऑक्टोबर रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. 2012 मध्ये ‘फुकरे’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली होती. याच चित्रपटाच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. 2019 मध्ये अलीने रिचाला लग्नासाठी प्रपोज केलं. 2020 मध्येच हे दोघं लग्न करणार होते. मात्र कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे त्यांना लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागली.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.