AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महानायकही झाले होते कंगाल, तरीही धीरूभाईंनी दिलेला मदतीचा हात नाकारला! जाणून घ्या ‘हा’ अनोखा किस्सा

बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा ‘जंजीर’ 1973मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली होती. या चित्रपटाने त्यांना यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले.

महानायकही झाले होते कंगाल, तरीही धीरूभाईंनी दिलेला मदतीचा हात नाकारला! जाणून घ्या ‘हा’ अनोखा किस्सा
अमिताभ बच्चन
| Updated on: May 18, 2021 | 4:35 PM
Share

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा ‘जंजीर’ 1973मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली होती. या चित्रपटाने त्यांना यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. मात्र, 90चं दशक उजाडेपर्यंत त्यांच्यावर अशी वेळ येऊन ठेपली की, त्यांच्याकडे काहीच उरलं नाही. एकीकडे त्याचं घर सरकारकडून सील केलं जात होतं, तर दुसरीकडे त्यांच्या खिशात काहीच पैसे शिल्लक राहिले नव्हते. बँक बॅलन्सही शून्य झाला होता. ही घटना स्वतः अमिताभ बच्चन यांनी रिलायन्स कंपनीच्या 40व्या वर्धापन दिनी सांगितली होती (When Amitabh Bachchan refuse to take help from Dhirubhai Ambani.

या कार्यक्रमातील काही व्हिडीओ आजही खूप शेअर केले जातात. याच कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी त्या कटू आठवणी सांगितल्या, ज्यावेळी ते अक्षरशः कंगाल झाले होते. आणि त्याच वेळी धीरूभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांनी अमिताभ यांना मदतीचा हात देऊ केला होता. आपला आयुष्यातील हा वाईट टप्पा आठवताना अमिताभ म्हणाले, “एक वेळ अशी आली जेव्हा मी दिवाळखोर झालो होतो. माझी स्वतःची कंपनी तोट्यात गेली होती. कोट्यवधी रुपयांचे कर्ज माझ्यावर पडले होते. माझी वैयक्तिक बँक शिल्लक शून्य होती. सर्व बाजूंनी कमाई बंद करण्यात आली होती आणि सरकारच्या वतीने घर देखील सील करण्यात आले होते.”

त्याची वाईट वेळ सुरु आहे, त्याला थोडे पैसे द्या..

याबद्दल सांगताना बिग बी पुढे म्हणाले, “धीरूभाईंना माझ्याबद्दल कळले. त्यांनी आपला धाकटा मुलगा आणि माझा मित्र अनिल अंबानी यांना सांगितले की, आता त्याची वाईट वेळ सुरु आहे, त्याला थोडे पैसे दे. त्यावेळी अनिल माझ्याकडे आले आणि मला हे सर्व सांगितले. ते जेवढी मदत मला देऊ करत होते, तेवढ्यात माझे सर्व प्रश्न सुटले असते. मी त्यांच्या उदारपणा पाहून भावूक झालो होतो. परंतु, त्याचवेळी मला वाटले की, कदाचित त्यांचे औदार्य मला स्वीकारता येणार नाही. देव आशीर्वाद पाठीशी होता आणि वेळ बदलली. नवीन कामं सुरू झाली आणि मग हळूहळू मी माझे सर्व कर्ज फेडून टाकले.”( When Amitabh Bachchan refuse to take help from Dhirubhai Ambani)

एकदा धीरूभाई अंबानी यांच्या घरी मेजवानीला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी आपल्या व्यवसाय जगातील लोकांशी माझी ओळख कशी करुन दिली, असाही एक किस्सा अमिताभ यांनी सांगितला. अमिताभ बच्चन म्हणाले की, “मला संध्याकाळी धीरूभाईंच्या घरी एका पार्टीसाठी आमंत्रित केले गेले होते. एकीकडे धीरूभाई लॉनवर एका बाजूला आपल्या कॉर्पोरेट जगाच्या दिग्गजांशी बोलत होते. तेव्हा त्यांची नजर माझ्यावर गेली. त्यांनी मला बोलावले आणि म्हणाले,  इकडे या आणि माझ्याबरोबर बसा. पण, मला खूप विचित्र वाटलं. मी त्यांना सांगितले की नाही, मी तिथे माझ्या मित्रांसह बसलो आहे, मी इथेच ठीक आहे.”

तो मुलगा रसातळाला गेला, पण आज पुन्हा स्वतःच्या हिमतीवर उभा राहिला!

यानंतर भावूक होत अमिताभ बच्चन म्हणाले, ‘त्यावेळी त्यांनी मला जवळ बोलावले आणि दिग्गजांच्या बैठकीत म्हणाले की, हा मुलगा रसातळाला गेला होता, परंतु आज स्वतःच्या बळावर पुन्हा उभा राहिला आहे, मी त्याचा खूप आदर करतो. त्यांचे हे वागणे आणि त्यांचे कौतुकाचे शब्द माझ्यासाठी, मला या संकटापासून मुक्त होण्यासाठी ते जितके पैसे देण्यास इच्छुक होते, त्यापेक्षा हजारो पट जास्त होते. असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.”

(When Amitabh Bachchan refuse to take help from Dhirubhai Ambani)

हेही वाचा :

Religion Change : प्यार दिवाना होता हैं…, ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रींनी केलं धर्म परिवर्तन

PHOTO | CSKच्या ऋतुराज गायकवाडला डेट करतेय मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव, ‘काहे दिया परदेस’मधून मिळाली ओळख!

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.