AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छोट्याशा वादात सैफने व्यावसायिकाच्या नाकावर मारला ठोसा, पोलीस स्टेशनपर्यंत गेलं होतं प्रकरण, वाचा पुढे काय झालं…

बॉलिवूडचा छोटा नवाब अर्थात अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आपल्या अभिनयाने बऱ्याच काळापासून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. सैफने आपल्या कारकीर्दीत अनेक प्रकारचे चित्रपट केले आहेत.

छोट्याशा वादात सैफने व्यावसायिकाच्या नाकावर मारला ठोसा, पोलीस स्टेशनपर्यंत गेलं होतं प्रकरण, वाचा पुढे काय झालं...
सैफ अली खान
| Edited By: | Updated on: May 16, 2021 | 11:35 AM
Share

मुंबई : बॉलिवूडचा छोटा नवाब अर्थात अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आपल्या अभिनयाने बऱ्याच काळापासून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. सैफने आपल्या कारकीर्दीत अनेक प्रकारचे चित्रपट केले आहेत. चाहत्यांमध्ये सैफ जितका त्याच्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहे, तितकाच तो अनेक वादांमुळे देखील प्रसिद्ध आहे. अनेक वादांत सैफ अली खानचे नाव खूप चर्चेत आले होते. मग ते काळवीट शिकार प्रकरण असो किंवा व्यावसायिकाला मारहाण केल्याचे प्रकरण…(When Saif Ali Khan arrested for assaulted south African businessman in hotel)

जेव्हा हॉटेलमध्ये दक्षिण आफ्रिकेत राहणार्‍या व्यावसायिकावर सैफ अली खानने हल्ला केला, तेव्हा तो मोठ्या वादात सापडला होता. हा वाद अभिनेत्याला खूपच महागात पडला होता, यामुळे सैफवर खूप टीकाही झाली होती.

सैफने केली मारहाण

बातमीनुसार 22 फेब्रुवारी 2012 रोजी सैफ अली खान आपल्या मित्रांसह कुलाबातील ताज मधील जपानी रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेला होता. एनआरआय व्यावसायिक इक्बाल हे त्याच्या शेजारी टेबलवर आपल्या कुटुंबासमवेत बसवले होते. त्यावेळी सैफच्या टेबलवरुन बराच आवाज सुरु होता, ज्यामुळे इक्बालला त्रास होत होता. त्याने याबाबत तक्रार केली होती, यावर सैफने त्याला सांगितले होते की, आपण कुठेतरी दुसरीकडे बसावे. यावरून त्यांच्यात बरेच वादविवाद झाले होते आणि यादरम्यान सैफने इक्बालला मारहाण केली. असं म्हणतात की, सैफने केलेल्या या मारहाणीत या व्यावसायिकाचे नाक तुटले होते.

सैफला झाली अटक

त्यावेळी सैफला या व्यवसायिकाशी असलेला वाद खूप महागात पडला होता, अनिवासी भारतीय व्यापारी इक्बाल मीर शर्मा यांच्या तक्रारीवरून सैफ आणि त्याच्या मित्रांना अटक करण्यात आली होती. मात्र नंतर तिघांनाही जामिनावर सोडण्यात आले (When Saif Ali Khan arrested for assaulted south African businessman in hotel).

सैफवर कारवाई

या हल्ल्यानंतर जवळपास दोन वर्षांनी स्थानिक कोर्टाने सैफ आणि त्याच्या दोन मित्रांवरील आरोप निश्चित केले होते. कोर्टाने सैफ अली खान आणि त्याचे दोन मित्र शकील लडक आणि बिलाल अमरोही यांच्याविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 325 (प्राणघातक हल्ला) आणि 34 (सामान्य हेतू) अंतर्गत आरोप निश्चित केले होते. तथापि, सैफ यांनी न्यायालयात आपल्यावर असणारे आरोप निराधार असल्याचे सांगितले.

वादविवाद आणि सैफ

एकदा सैफ अली खानने प्रशासनाच्या परवानगीशिवाय जयपूरमध्ये हेलिकॉप्टर उतरवले होते, ज्यामुळे त्याला फारच मोठी किंमत मोजावी लागली होती. जयपूरमध्ये सैफ अली खानच्या अ‍ॅड शूटमध्ये वापरण्यात येणारे हेलिकॉप्टर जप्त करण्यात आले होते, कारण त्याने उड्डाण करण्याची परवानगी घेतली नव्हती. त्याच वेळी काळवीट शिकार प्रकरणात सैफही अडकला होता. तर जैसलमेरमध्ये ‘एजंट विनोद’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानही  तो वादातही सापडला होता.

(When Saif Ali Khan arrested for assaulted south African businessman in hotel)

हेही वाचा :

PHOTO | ‘हसीनाने आग लगा रखी है’, केपटाऊनच्या समुद्र किनाऱ्यावर दिव्यांका त्रिपाठीचा जलवा

PHOTO | लंडनच्या लॉकडाऊनमध्ये आयुष्यभराचे क्वारंटाईन, ‘लॉकडाऊन लग्न’ चित्रपटाचे पोस्टर लाँच

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.