PHOTO | लंडनच्या लॉकडाऊनमध्ये आयुष्यभराचे क्वारंटाईन, ‘लॉकडाऊन लग्न’ चित्रपटाचे पोस्टर लाँच

लंडनच्या लॉकडाऊनमध्ये आयुष्यभराचे क्वारंटाईन असा आगळावेगळा विषय घेऊन चित्रपट येणार आहे. त्यामुळेच एकूणच नेमकं या चित्रपटात काय घडणार, वा कथानकाचे स्वरूप काय असणार याकडे सिनेप्रेमींच्या नजरा वळल्या आहेत.

1/5
निर्माते किरण कुमावत, अमोल लक्ष्मण कागणे, गौरी सागर पाठक यांच्या डॉक्टर डॉक्टर चित्रपटाच्या यशानंतर ते पुन्हा एकदा नव्या कोऱ्या आणि दमदार विषयाच्या संकल्पनेसह प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहेत. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर 'लॉकडाऊन लग्न' या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.
2/5
निर्माता किरण कुमावत, अमोल लक्ष्मण कागणे, गौरी सागर पाठक सह निर्माता हर्षवर्धन भरत गायकवाड, स्वाती खोपकर आणि सहनिर्माते म्हणून निनाद बट्टीन आणि तबरेज पटेल यांचाही या चित्रपटाच्या निर्मिती क्षेत्रात वाटा आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन सुमित संघमित्रा करत असून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तिच्यासह या चित्रपटात आणखी कोणते कलाकार दिसणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.
3/5
अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून पोस्टरमध्ये मास्क हा अंतरपाट म्हणून धरण्यात आला आहे. आणि त्यावर आमंत्रण पत्रिकाही छापली आहे. तर ओवाळणीच्या ताटासोबत सॅनिटायझर, ऑक्सिमिटर ठेवण्यात आले आहे. लंडनच्या लॉकडाऊनमध्ये आयुष्यभराचे क्वारंटाईन असा आगळावेगळा विषय घेऊन चित्रपट येणार आहे. त्यामुळेच एकूणच नेमकं या चित्रपटात काय घडणार, वा कथानकाचे स्वरूप काय असणार याकडे सिनेप्रेमींच्या नजरा वळल्या आहेत.
4/5
या चित्रपटाची मजेदार कथा सुमीत संघमित्रा आणि सागर पाठक यांनी लिहिली आहे. तर या चित्रपटाचे डिओपी योगेश कोळी आहेत. या शिवाय या लग्नकथेला खरा साज चढवलाय तो 'लॉकडाऊन लग्न' या चित्रपटातील गाण्यांनी. या चित्रपटाच्या संगीताची धुरा अभिजीत कवठळकर याने पेलवली आहे.
5/5
लॉकडाऊन मधील हा आगळावेगळा विषय हाताळण्याचे धाडस दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी केला आहे. 'लॉकडाऊन लग्न' या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाला रसिक-मायबाप हजेरी लावून तितकेच प्रेम देतील अशी आशा आहे.