AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खान – अरबाज खान यांच्यात टोकाला पोहोचलेले वाद, ‘मी त्याला पेन्सिलनं भोसकलं, त्यानंतर…’

Salman Khan: 'मी त्याला पेन्सिलनं भोसकलं, त्यानंतर...', जेव्हा सलमान खान याने रागात अरबाज खान याला मारण्याचा केला प्रयत्न, फार कमी लोकांना माहिती आहे नक्की काय होतं सत्य, सलमान खान कायम असतो चर्चेत...

सलमान खान - अरबाज खान यांच्यात टोकाला पोहोचलेले वाद, 'मी त्याला पेन्सिलनं भोसकलं, त्यानंतर...'
| Updated on: Sep 28, 2024 | 1:29 PM
Share

अभिनेता सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सलमान खान त्याच्या कुटुंबाबद्दल देखील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतो. एकदा सलमान खान याने मोठा खुलासा केला होता. भाईजानने भाऊ अरबाज खान याच्या छातीमध्ये पेन्सिल भोसकली होती. ‘दस का दम’ शोमध्ये सलमान खान याने लहानपणी घडलेला किस्सा सांगितला होता. याबद्दल सलमान खान याच्या फार कमी चाहत्यांना माहिती आहे. सध्या सर्वत्र सलमान खान याची चर्चा रंगली आहे.

शोमध्ये सलमान खान बालपणीच्या आठवणी ताज्या करत म्हणाला, सलमान खान परीक्षा असल्यामुळे अभ्यास करत होता. तेवढ्यात अरबाज त्याठिकाणी आला आणि सलमान याला चिडवू लागला. परीक्षा कोणत्या विषयाची आणि अभ्यास कोणत्या विषयाचा करतोय… असं अरबाज, सलमान खान याला म्हणाला.

अरबाज सतत चिडवत असल्यामुळे सलमान याला देखील राग आला. अखेर रागावलेल्या सलमान खान याने हातात असलेला पेन्सिल अरबाजच्या दिशेने फेकली. अरबाज याला देखील पेन्सिल जोरात लागली आणि त्याला जखम देखील झाली. अशात दोन्ही भाव प्रचंड घाबरले… आई – वडील आता ओरडतील अशी भीती दोघांना वाटू लागली… असा खुलासा खुद्द सलमान खान याने शोमध्ये केला होता.

सांगायचं झालं तर, सलमान खान कायम त्यांच्या कुटुंबियांबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांना सांगत असतो. शिवाय अभिनेता कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर जीवापाड प्रेम करतो. सलमान खान याला अनेकदा अरबाज खान, सोहैल खान यांच्यासोबत देखील स्पॉट केलं जातं. अनेक सिनेमांमध्ये देखील सलमान याने भावांसोबत स्क्रिन शेअर केली आहे.

अरबाज, सोहैल यांनी देखील अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली पण सलमान खान प्रमाणे दोघांना देखील बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही. अरबाज, सोहैल त्यांच्या प्रोफेशलन आयुष्यामुळे चर्चेत नसले तरी त्यांच्या खासगी आयुष्याची चर्चा तुफान रंगली.

सलमान खान याच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, सलमान खान लवकरच ‘सिकंदर’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात सलमान खान याच्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना पहिल्यांदा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. चाहते देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.