AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salim Khan : कोट्यावधीत खेळणाऱ्या सलमानचे पूर्वज आले कुठून? वाचा खुद्द वडील सलीम खान काय म्हणतात?

सलीम खान यांनी एका मुलाखतीतून त्यांचा भूतकाळ उलगडला आहे. (Where did Salman Khan's ancestors come from?)

Salim Khan : कोट्यावधीत खेळणाऱ्या सलमानचे पूर्वज आले कुठून? वाचा खुद्द वडील सलीम खान काय म्हणतात?
| Updated on: Dec 27, 2020 | 6:06 PM
Share

मुंबई : जगभरात आपल्या अभिनयाची छाप सोडणारा ‘दबंग’ म्हणजेच सलमान खानचा आज वाढदिवस. सलमानच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरातून त्याला शुभेच्छा देण्यात येत आहेत. सोबतच त्याचं बालपण, चित्रपट, वैयक्तिक आयुष्य, त्याची संपत्ती, व्यवसाय, सेलिब्रेशन आणि त्याच्या स्वभावाबद्दल अनेक बातम्या ट्रेंडमध्ये आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला हे ‘खान’ कुटुंब म्हणजेच सलमाच खानचे पूर्वज आले कुठून किंवा भारतात येण्यामागचं कारण काय होतं याबाबत माहिती देणार आहोत.

तर सलमान खानचे वडिल म्हणजेच प्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि लेखक सलीम खान यांनी एका मुलाखतीतून त्यांचा भूतकाळ उलगडला आहे, या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, सुमारे 175 ते 200 वर्षांपूर्वी खान कुटुंब अत्यंत बिकट आणि गरिब परिस्थितीत अफगाणिस्तानमध्ये राहत होतं. त्याकाळी अफगाणिस्तानची परिस्थितीसुद्धा प्रचंड वाईट होती. भारताबद्दल नेहमी चांगल्या गोष्टी ऐकण्यात यायच्या जसं की, भारतात न्याय व्यवस्था आहे, शाळा कॉलेज आहेत, रुग्णालयं आहेत. त्यामुळे सलीम यांचे पूर्वज अन्वर खान यांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला आणि ते भारतातील इंदोरमध्ये स्थायिक झाले. भारतात आल्यानंतर त्यांनी घोड्यांना सांभाळण्याचं काम केलं आणि त्या अत्यंत कमी पगारामध्ये मुलांना शिक्षण देत त्यांना मोठं केलं.

अशा बिकट परिस्थितीतून येत आज ‘खान’ कुटुंब यशाच्या शिखरावर पोहोचलंय. आज खान कुटुंबाकडे पैसा आणि लोकांचं प्रचंड प्रेम आहे. सध्या सलमान खानकडे असलेल्या संपत्तीवर नजर टाकूया.

5 बीएचके फ्लॅट सलमान खानजवळ गोराई येथे 5 बीएचके फ्लॅट आहे. सलमान खानचे हे घर त्याच्या वांद्रे येथील घरापासून दूर असल्यामुळे तो येथे क्वचितच जातो. सर्व सोयीसुविधांनी युक्त असे हे घर आहे. सलमानच्या या घरात जिम, स्विमिंग पूल आणि एक मिनी सिनेमागृह आहे. हे घर समुद्राच्या काठावर असल्याने त्याची किंमत तब्बल 75 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं.

पनवेलमध्ये फार्महाऊस पनवेल येथे त्याच्या मालकीचा एक फार्महाऊस आहे. या फार्महाऊसवर वेळ घालवणे सलमान खानला आवडते. कित्येक एकरांमध्ये हा फार्महाऊस पसरला असल्याचे सांगितले जाते. या फार्महाऊसची किंमत तब्बल 80 कोटी रुपये आहे.

वांद्रे येथे घर मुंबईतील महागडा म्हटल्या जाणाऱ्या वांद्रे भागात सलमानचे घर आहे. हे घर छोडे आहे. मात्र, या घराची किंमत 16 कोटी आहे. या घरात त्याच्या आवडीचे कुत्रेही आहेत. सलमानला या कुत्र्यांसोबत वेळ घालायला आवडते.

यॉट सलमान खानजवळ एक यॉटसुद्धा आहे. समुद्रसफारी करायची असल्यास तो या यॉटचा वापर करतो. या यॉटची किंमत 3 कोटी असल्याचं सांगितलं जातं.

रेंज रोवर सलमान खान महागड्या गाड्यांचा शौकीन आहे. मात्र, सलमानला पांढऱ्या ऱंगाच्या गाड्यांमध्ये सफर करणं आवडतं. सलमान खानकडे एक मर्सिडिज होती. मात्र, त्यांनतर त्याने रेंज रोवर कार घेतली. या कारमधून तो मुंबईत फिरतो. त्याचबरोबर सलमानजवळ बीएमडब्ल्यू X6, ऑडी R8, टोयोटा लैंड क्रूजर, ऑडी RS7, लेक्सस LX470, मर्सिडीज बेंज सारख्या महागड्या कार त्याच्याकडे आहेत.

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.