AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Roy Ex-Wife : राहुल रॉय याची एक्स वाईफ कुठे आहे ? दोन विवाह अयशस्वी, नंतर इंडस्ट्रीमधून गायब

आशिकी फेम अभिनेता राहुल रॉय याची पूर्व पत्नी देखील एकाच म्युझिक अल्बमने प्रकाश झोतात आली होती. त्यानंतर तिचा पहिला विवाह अयशस्वी झाला.त्यानंतर राहुल रॉय तिच्या आयुष्यात आला, मात्र....

Rahul Roy Ex-Wife : राहुल रॉय याची एक्स वाईफ कुठे आहे ? दोन विवाह अयशस्वी, नंतर इंडस्ट्रीमधून गायब
Rahul Roy and Rajalakshmi Khanvilkar
| Updated on: May 07, 2026 | 8:31 PM
Share

चित्रपटाची रुपेरी दुनियेत अनेक चेहरे एका गाण्यात वा एका प्रोजेक्टने रातोरात स्टार बनतात. मात्र,काही काळानंतर हे तारे गायबही होतात. ‘आशिकी’ या एकाच चित्रपटाने अभिनेता राहुल रॉल रातोरात स्टार झाला. मात्र अलिकडे राहुल रॉय याच्या काही रिल्स पाहून त्याची आर्थिक स्थिती बिकट असल्याने त्याला रोस्ट केले जात होते. त्यानंतर त्याने स्वत: खुलासा करत आपण बहिणीकडे राहात असून सुखरुप आहे. मला कोणाची दया नको असे त्याने स्पष्ट केले होते. मात्र, राहुल रॉय याची एक्स वाईफ देखील एकाच म्युझिक व्हिडीओत स्टार झाली होती.तिने दोन लग्नं केली होती. दोन्ही टिकली नाहीत. आज ही राजलक्ष्मी खानविलकर कुठे आहे ?

पंकज उधास यांचे ‘चुपके चुपके सखियों से वो’हे गाणे जेव्हा रिलीज झाले तेव्हा हे गाणे अनेकांना आवडले आणि त्यातील अभिनेत्री रातोरात प्रसिद्ध झाली. या गाण्यात राजलक्ष्मी खानविलकर बरोबर अभिनेता जॉन अब्राहम होता. जॉनला पुढे बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक मिळाला. तर राजलक्ष्मीच्या सौदर्याची चर्चा झाली.

समीर सोनी याच्याशी प्रेम 6 महिन्यात घटस्फोट

आपल्या करियरच्या सुरुवातीला राजलक्ष्मी हीने मॉडेलिंग आणि ‘बागबान’ चित्रपटातील अभिनेता समीर सोनी याच्या लग्न केले. दोघांची भेट एका कॅडबरीच्या जाहीरात शूटींगमध्ये झाली होती. त्यांच्यात प्रेम झाले आणि त्यांनी लग्नही केले. परंतू हे नाते फार काळ टिकले नाही. केवळ सहा महिन्यात दोघांचा घटस्फोट झाला. समीर सोनी यांनी सांगितले की ज्या रात्री त्यांचा डेब्यू चित्रपट रिलीज झाला त्याच रात्री त्यांचा घटस्फोट देखील फायनल झाला.

राहुल रॉय सोबत दुसरा विवाह आणि 14 वर्षांचे नाते

पहिले लग्न तुटल्यानंतर राजलक्ष्मी हिने साल २००० मध्ये ‘आशिकी’ फेम राहुल रॉय याच्या लग्न झाले. हे नाते दीर्घकाळ चालले आणि दोघे १४ वर्षे एकत्र होते. मात्र,साल २०१४ मध्ये दोघांनी परस्पर सहमतीने एकमेकांना घटस्फोट दिला. हे नाते संपताच ती हळूहळू लाईमलाईट पासून दूर गेली.

ग्लॅमर पासून राखले अंतर

दोन्ही लग्ने अयशस्वी ठरल्याने आणि ग्लॅमर जगतापासून दूर झाल्याने आता अभिनेत्री राजलक्ष्मी खानविलकर कुठे आहे आणि काय करत आहे ? याची जास्त माहिती मिळालेली नाही. तिने मीडिया आणि फिल्म इंडस्ट्री दोन्हींपासून फारकत घेतली आहे. एकेकाळी प्रकाश झोतात असलेले राजलक्ष्मी आज कुठेच दिसत नाही.

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?