मुंबईत 100 कोटींच्या आलिशान बंगल्यात रेखा कोणासोबत राहतात? घरातील नोकरांनाही बेडरूममध्ये प्रवेश का नाही?
रेखा या नेहमी त्यांच्या चित्रपटांपेक्षाही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी चर्चेत राहिल्या आहेत. एवढंच नाही तर त्यांच्या मुंबईतील घर हे एक सर्वांसाठी रहस्यच आहे. मग रेखा एवढ्या मोठ्या बंगल्यात नक्की कोणासोबत राहतात? तसेच त्यांच्या बेडरुममध्ये घरातील नोकरांना देखील प्रवेश का दिला जात नाही? जाणून घेऊयात.

बॉलीवूडची दिग्गज अभिनेत्री रेखा यांच्याबद्दल वेगळं काही सांगण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या चित्रपटांप्रमाणेच त्यांच्या सौंदर्याचे आजही तेवढेच चाहते आहेत. रेखा यांनी वयाच्या 16 व्या वर्षी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. आता त्या 71 वर्षांच्या होणार आहेत. रेखा 10 ऑक्टोबर रोजी तिचा 71 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. रेखा कायमच त्यांच्या चित्रपटांपेक्षाही त्यांच्या सौंदर्यामुळे आणि विशेषत: त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिल्या आहेत.
रेखा यांचा मुंबईत 100 करोडचा आलिशान बंगला आहे.
रेखा यांचा मुंबईत 100 करोडचा आलिशान बंगला आहे. आजही त्या सिंगलच आयुष्य जगत आहेत. पण मग त्या मुंबईतील एवढ्या मोठ्या आलिशान बंगल्यात कोणासोबत राहतात की एकट्याच राहतात? असा पश्न अनेकदा त्यांच्या चाहत्यांना पडलेला असतो. चला याबद्दल जाणून घेऊयात.
रेखा यांचा बांद्रा येथील बँडस्टँड येथे आलिशान बंगला आहे. अभिनेत्रीने या बंगल्याचे नाव बसेरा ठेवले आहे. 100 कोटी रुपयांची किंमत असलेले हे घर त्याच्या डिझाइन आणि शाही लूकसाठी सातत्याने चर्चेत असते. वृत्तानुसार, रेखाच्या अगदी जवळचे लोकच या घरात प्रवेश करू शकतात. कोणालाही त्यांच्या घरात येण्याची सहजपणे परवानगी मिळत नाही.
रेखा मुंबईत कोणासोबत राहते?
तसं पाहायला गेलं तर रेखा यांचे घर खरंच एक रहस्यमय ठिकाण आहे. कारण त्यांच्या घरातील फोटो फारसे बाहेर आलेले नाही. अहवालांनुसार, रेखा तिच्या सेक्रेटरी फरजानासोबत या बंगल्यात राहताच. एवढंच नाही तर रेखा यांच्या बेडरूममध्ये देखील फरजाना यांनाच प्रवेश आहे. बाकी घरातील इतर नोकरांनाही रेखा यांच्या बेडरूममध्ये प्रवेश दिला जात नाही.
रिपोर्ट्सनुसार, फरजाना या रेखाच्या संपूर्ण घराची एकमेव व्यक्ती आहे जे सर्वकाही काळजी घेतात तसेच त्या सर्वकाही नियंत्रित करतात. शिवाय फरजान जिथे रेखा असतात तिथे त्या असतातच. अगदी सावलीसारखं रेखासोबत असतात.
रेखा यांची किती लग्ने झाली आहेत?
रेखा यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं तर अनेक वृत्तांत असे म्हटले जाते की त्यांनी दोनदा लग्न केले आहे. असे म्हटले जाते की त्यांनी पहिले लग्न बॉलिवूड अभिनेते विनोद मेहरा यांच्याशी केले होते. तथापि, अभिनेत्याच्या आईला हे नाते मान्य नव्हते.
रेखा यांच्या वैवाहिक जीवनाचे सत्य
यासर उस्मान यांनी लिहिलेल्या रेखा ‘द अनटोल्ड स्टोरी’ या रेखा यांच्या चरित्रात असा उल्लेख आहे की विनोद मेहरा आणि रेखा यांनी कोलकाता येथे गुपचूप लग्न केले. लग्नानंतर, जेव्हा अभिनेता रेखा यांना घरी घेऊन आले तेव्हा त्यांची आई संतापली. जेव्हा रेखा त्यांच्या सासूच्या पायांना स्पर्श करायला गेल्या तेव्हा त्यांनी अभिनेत्रीला ढकलले. त्या वादानंतर असे म्हटले जाते की त्यानंतर विनोद मेहरा यांनी रेखा यांना घर सोडण्यास सांगितले.
दुसऱ्या पतीने आत्महत्या केली
रेखा यांनी 1990 मध्ये दिल्लीतील व्यावसायिक मुकेश अग्रवाल यांच्याशी दुसरे लग्न केले. मुकेश हॉटलाइन किचनवेअर ब्रँडचे मालक होते. तथापि, हे लग्न फार काळ टिकले नाही. लग्नाच्या सहा महिन्यांतच अभिनेत्रीच्या पतीने आत्महत्या केली. तिच्या पतीच्या आत्महत्येनंतर रेखा यांना नॅशनल व्हँपचा टॅग मिळाला.
रेखा सिंदूर का लावतात?
रेखा त्यांच्या लूक आणि फॅशन स्टेटमेंटमुळेही चर्चेत असतात. खरं तर, त्या नेहमी सिंदूर लावताना दिसतात. रेखा सिंगल असताना कोणाच्या नावाचे सिंदूर लावतात हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. त्यावर रेखा यांनी वारंवार सांगितले आहे की सिंदूर हे त्यांच्यासाठी एक फॅशन स्टेटमेंट आहे आणि ते त्यांच्या लूकला पूर्ण करते.
