AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OMG 2 | कोर्टात सर्वांसमोर हस्तमैथुनचा अर्थ सांगणारी पंकज त्रिपाठी यांची ऑनस्क्रीन मुलगी कोण?

अन्वेषाने अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं असून आजवर तिला भूमिका ऑडिशन्सच्या जोरावरच मिळाल्याचं तिने सांगितलं. अन्वेषाने सुरुवातीला लहानसहान भूमिका साकारल्या. मात्र 'क्रॅश कोर्स' हा प्रोजेक्ट तिच्या करिअरला नवीन वळण देणारा ठरला.

OMG 2 | कोर्टात सर्वांसमोर हस्तमैथुनचा अर्थ सांगणारी पंकज त्रिपाठी यांची ऑनस्क्रीन मुलगी कोण?
Anvesha VijImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 23, 2023 | 1:44 PM
Share

मुंबई | 23 ऑगस्ट 2023 : अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘OMG 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी स्पर्धा असतानाही कमाईचा 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. प्रेक्षक-समीक्षकांकडून या चित्रपटातून मांडण्यात आलेल्या मुद्द्याचं, कलाकारांच्या दमदार अभिनयाचं आणि त्यातून दिलेल्या महत्त्वाच्या संदेशाचं कौतुक होत आहे. यामध्ये पंकज त्रिपाठी यांच्या दमदार अभिनयकौशल्याची तर प्रशंसा होतच आहे. मात्र चित्रपटात त्यांच्या मुलीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्री अन्वेषा विजने ‘OMG 2’मध्ये दमयंतीची भूमिका साकारली आहे.

चित्रपटातील भूमिकेविषयी अन्वेषा एका मुलाखतीत म्हणाली, “मी फार नशीबवान आहे. ओह माय गॉड 2 सारखा प्रोजेक्ट करिअरच्या सुरुवातीलाच मिळणं हे माझ्यासाठी एखाद्या स्वप्नासारखं आहे. चित्रपटातील भूमिका ही माझ्या स्वभावापेक्षा खूप वेगळी आहे. माझ्यासाठी ते साकारणं खूप औत्सुक्याचं होतं. या चित्रपटासाठी मी सर्वांत आधी दिल्लीत ऑडिशन दिलं होतं. पण हे ऑडिशन ‘OMG 2’ या चित्रपटासाठी होतं, याची कल्पना मला त्यावेळी नव्हती. पहिल्या राऊंडनंतर जेव्हा मला शॉर्टलिस्ट करण्यात आलं, तेव्हा मला समजलं की ही OMG 2 मधील भूमिका आहे. त्यानंतर मी तीन-चार राऊंड्स पुन्हा ऑडिशन्स दिले आणि मला या भूमिकेसाठी निवडलं गेलं.”

View this post on Instagram

A post shared by Anvesha Vij (@anveshavij)

पंकज त्रिपाठी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता, याविषयी सांगताना अन्वेषा पुढे म्हणाली, “मी सेटवर सर्वाधिक वेळ पंकज सरांसोबतच घालवला होता. त्यांनी भूमिका साकारण्यासाठी माझी फार मदत केली. ते खूप चांगले सहकलाकार आहेत. आम्ही गप्पा मारायचो तेव्हा ते मला त्यांचे अनुभव सांगायचे. अक्षय सरांमुळेही सेटवर हसतं-खेळतं वातावरण असायचं.”

अन्वेषाने अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं असून आजवर तिला भूमिका ऑडिशन्सच्या जोरावरच मिळाल्याचं तिने सांगितलं. अन्वेषाने सुरुवातीला लहानसहान भूमिका साकारल्या. मात्र ‘क्रॅश कोर्स’ हा प्रोजेक्ट तिच्या करिअरला नवीन वळण देणारा ठरला. या अनुभवाविषयी तिने सांगितलं, “मी बरेच ऑडिशन्स दिले होते आणि अखेर मला अॅमझॉन प्राइमच्या वेब सीरिजसाठी शॉर्टलिस्ट केलं गेलं. मी मुंबईला आले, तेव्हा खूपच उत्सुक होते. दोन दिवसांत माझी परीक्षा होती. माझ्या आईने खूप पाठिंबा दिला. मुंबईत येऊन मी ऑडिशन्स दिले आणि त्यानंतर दोन दिवसांनी मी परीक्षा दिली.” अन्वेषाने ‘क्रॅश कोर्स’ या वेब सीरिजमध्ये निक्की कपूरची भूमिका साकारली होती.

पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.