AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्रीसोबत व्हॅनिटी व्हॅनमध्ये गैरव्यवहार; प्रसिद्ध दिग्दर्शकाला तुरुंगवास

प्रसिद्ध दिग्दर्शक रंजीतला पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर कोर्टाने त्याची रवानगी तुरुंगात केली आहे. एका अभिनेत्रीने रंजीतवर गंभीर आरोप केले आहेत. व्हॅनिटी व्हॅनमध्ये लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिने केला आहे.

अभिनेत्रीसोबत व्हॅनिटी व्हॅनमध्ये गैरव्यवहार; प्रसिद्ध दिग्दर्शकाला तुरुंगवास
दिग्दर्शक रंजितImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 01, 2026 | 2:53 PM
Share

मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते रंजित बालकृष्णनवर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप लावण्यात आला आहे. याप्रकरणी केरळ पोलिसांनी त्याला मंगळवारी अटक केली असून बुधवारी न्यायालयाने त्याला 13 एप्रिल 2026 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. एका अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर आणि एफआयआर दाखल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कोची पोलिसांनी रंजितला इडुक्कीमध्ये अटक केली. त्यानंतर चौकशी करून त्याला एर्नाकुलमच्या मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात आलं. 30 जानेवारी रोजी एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान लोकेशनवरील व्हॅनिटी व्हॅनमध्ये लैंगिक शोषणाचा प्रयत्न केल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे.

अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर FIR

रंजित बालकृष्णनला पोलिसांनी जेव्हा 31 मार्च रोजी ताब्यात घेतलं होतं, तेव्हा त्याने प्रकृती अस्वस्थ असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्याला आरोग्याच्या तपासणीसाठी एर्नाकुलम जनरल रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तपासणीनंतर रंजितला कुठलीही गंभीर आरोग्याची समस्या नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. यानंतर रंजितला कोर्टासमोर हजर केलं असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. हे प्रकरण एका अशा घटनेशी संबंधित आहे, जी कथितरित्या एका चित्रपटाच्या सेटवर घडली होती. पोलिसांनी रंजितच्या जुन्या प्रकरणांचाही कोर्टात उल्लेख केला होता. त्याच्यावर अशा पद्धतीचे गंभीर आरोप होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.

याआधीही गंभीर आरोप

याआधी 2024 मध्ये एका बंगाली अभिनेत्रीने रंजितवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. तेव्हा सांगितलं गेलं होतं की 2009 मध्ये एका चित्रपटाच्या चर्चेदरम्यान रंजितने अभिनेत्रीशी गैरवर्तन केलं. त्यावेळी सुद्धा त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. रंजीत बालकृष्णन हा मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता आहे. त्याने 2001 मध्ये ‘रावणप्रभू’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रातील करिअरची सुरुवात केली होती. त्याने आतापर्यंत तीन वेळ राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे.

राष्ट्रीय पुरस्कार

यात त्याच्या ‘स्पिरीट’ या चित्रपटाचाही समावेश आहे. या चित्रपटाला सामाजिक मुद्द्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. याशिवाय त्याच्या ‘तिराक्काथा’ आणि ‘इंडियन रुपी’ या चित्रपटांनाही 2008 आणि 2011 मध्ये मल्याळम भाषेतील सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला होता. रंजितने सहा वेळा केरळ राज्य चित्रपट पुरस्कारसुद्धा जिंकले आहेत.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल