Bollywood Richest Actress : बॉलिवूडमधील सर्वांत श्रीमंत अभिनेत्री कोण? रेखा, जया नाही, कधी या नावाचा विचारही केला नसेल
या अभिनेत्रीच्या कमाईचा मोठा भाग जाहिरातींमधूनही येतो. मॅगी, पेप्सी, कुरकुरे, रुहफ्जा, केलॉग्स, इमामी बोरोप्लस, केश किंग आयुर्वेदिक ऑइलसारख्या अनेक ब्रँडच्या ती जाहिराती करते. अनेक आलिशान गाड्यांचं कलेक्शन तिच्याकडे आहे.

अभिनेत्री ऐश्वर्या रायची एकूण संपत्ती 900 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाल्याची बातमी अलिकडेच समोर आली. यासोबतच ती बॉलिवूड इंडस्ट्रीतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत श्रीमंत अभिनेत्री ठरली आहे. यानंतर अनेकांना पडलेला प्रश्न म्हणजे, पहिल्या क्रमाकांवर कोण आहे? हे नाव रेखा किंवा जया बच्चन यांसारख्या दिग्गज अभिनेत्रीचं आहे की आलिया भट्टसारख्या लोकप्रिय अभिनेत्रीचं आहे, याविषयी नेटकऱ्यांनी बरेच तर्कवितर्क लावले. परंतु या श्रेणीतील पहिलं नाव सर्वांनाच चकीत करणारं आहे. बॉलिवूडमधील सर्वांत श्रीमंत अभिनेत्रीबद्दल बोलायचं झालं, तर या यादीत अग्रस्थानी जया बच्चन, रेखा, आलिया भट्ट किंवा कतरिना कैफही नाही.
सर्वाधिक संपत्ती असलेल्या या अभिनेत्रीचं नाव जूही चावला आहे. तिच्याकडे सुमारे 4,600 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. ऐश्वर्या राय, प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट आणि दीपिका पादुकोण यांच्यापेक्षाही तिची संपत्ती सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे 2009 पासून जूही चावलाने एकही हिट चित्रपट दिलेला नाही. तरीही तिच्या संपत्तीत सातत्याने वाढ होत आहे. तिच्या उत्पन्नाचा खरा स्रोत बॉलिवूड चित्रपट किंवा जाहिराती नाहीत, परंतु तिचा मोठा व्यवसाय आहे, ज्यातून ती कोट्यवधी कमावते. अभिनेता शाहरुख खानसोबत मिळून तिने आयपीएलमध्ये क्रिकेट टीमची फ्रँचाइजी खरेदी केली आहे. शाहरुखसोबत ती कोलकाता नाइट रायडर्सची सहमालक आहे. याशिवाय तिचे पती जय मेहतासोबत ती ‘रेड चिलीज’ ग्रुपची सहसंस्थापिकासुद्धा आहे. इतकंच नव्हे तर जूहीने सौराष्ट्र सिमेंट लिमिटेडमध्ये मोठा हिस्सा खरेदी केला आहे. तिने रिअल इस्टेट, रेस्टॉरंट आणि आलिशान प्रॉपर्टीजमध्येही गुंतवणूक केली आहे.
बॉलिवूडमधल्या इतर अभिनेत्रींची संपत्ती
- रेखा यांच्याकडे 100 कोटी रुपयांचा बंगला आहे. त्यांची एकूण संपत्ती सुमारे 300 कोटी रुपये आहे.
- जया बच्चन यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात 2 कोटी रुपयांची मालमत्ता आणि 40 कोटी रुपयांचे दागिने जाहीर केले आहेत.
- आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये आलिया भट्ट सर्वांत श्रीमंत आहे. तिची एकूण संपत्ती सुमारे 500 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं.
- दीपिका पादुकोणसुद्धा 500 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे.
- प्रियांका चोप्राची एकूण संपत्ती 80 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 700 कोटी रुपये आहे.
- कतरिना कैफची एकूण संपत्ती सुमारे 256 कोटी रुपये असल्याचं समजतंय.
