पद्मिनी कोल्हापुरेंनी सोडलेल्या चित्रपटामुळे बनले मंदाकिनीचे करिअर! वाचा ‘राम तेरी गंगा मैली’चा किस्सा…

पद्मिनी कोल्हापुरे यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत असे अनेक चित्रपट सोडले, जे नंतर रेखा (Rekha), श्रीदेवी (Sridevi) आणि रती अग्निहोत्री (Rati Agnihotri) यांच्या पदरी पडले.

पद्मिनी कोल्हापुरेंनी सोडलेल्या चित्रपटामुळे बनले मंदाकिनीचे करिअर! वाचा ‘राम तेरी गंगा मैली’चा किस्सा...
पद्मिनी कोल्हापुरे
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 8:30 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे (Actress Padmini Kolhapure) यांनी आजपर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी मनोरंजन विश्वात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. पद्मिनी कोल्हापुरे यांना अजूनही चाहत्यांच्या हृदयात खास स्थान आहे. मात्र, पद्मिनी कोल्हापुरे यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत असे अनेक चित्रपट सोडले, जे नंतर रेखा (Rekha), श्रीदेवी (Sridevi) आणि रती अग्निहोत्री (Rati Agnihotri) यांच्या पदरी पडले. त्यांना सुरुवातीला ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाची ऑफरदेखील देण्यात आली होती. पण त्यातील केवळ एका दृश्यामुळे त्यांनी हा चित्रपट नाकारला. हा चित्रपट नाकारल्याचा पश्चात्ताप त्यांना आजही होतो (Why Actress Padmini Kolhapure rejects Ram Teri Ganga Maili film know the reasons).

‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राज कपूर यांनी केले होते आणि त्यात अभिनेता राजीव कपूर यांनी मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर-डुपरहिट ठरला होता.

‘या’ दृश्याला होता आक्षेप!

पद्मिनी कोल्हापुरे यांनी एका मुलाखतीत सांगितले या चित्रपटाविषयी सांगताना म्हटले की, ‘राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील चुंबन दृश्यामुळे आपण हा चित्रपट नाकारला होता. त्यानंतर अभिनेत्री मंदाकिनीला ही भूमिका देण्यात आली.’ त्या म्हणाल्या की, मंदाकिनीने या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी केवळ 45 दिवस दिले होते, तरीही राज कपूर यांना मलाच या चित्रपटात कास्ट करायचे होते.

‘या’ चित्रपटांना दिला होता नकार!

पद्मिनी कोल्हापुरे यांनी सांगितले की, ‘त्यांना ‘एक दुजे के लिये’मधील रती अग्निहोत्री, ‘सिलसिला’मधील रेखा आणि ‘तोहफा’मधील श्रीदेवी यांनी साकारलेल्या भूमिका मला ऑफर झाल्या होत्या. पण, काही कारणास्तव त्या या भूमिका करू शकल्या नाहीत. आता आपण ऑफर केलेल्या प्रत्येक चित्रपटात काम करू शकतोच असे नाही. जर ‘राम तेरी गंगा मैली’ यासारख्या चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला असेल, तर तुम्हालाही या चित्रपटाचा एक भाग असायले हवे होते, असे वाटेल. ‘राम तेरी गंगा मैली’चे कथानक उत्तम काम होते आणि मंदाकिनीने त्यात उत्तम काम केले. त्यातील गाणीही खूप सुंदर होती. राजजीं ठाऊक होते की, मला का संकोच वाटत आहे. मी हा चित्रपट नाकारण्याचे खरे कारण त्यांना माहित होते.’ (Why Actress Padmini Kolhapure rejects Ram Teri Ganga Maili film know the reasons)

‘किसिंग’ सीनवर आक्षेप!

त्या पुढे म्हणतात, ‘चित्रपटातील ब्रेस्टफीडिंगच्या दृश्यामध्ये मला काही अडचण आली नाही. कारण, जेव्हा मी या प्रोजेक्टबद्दल चर्चा करत होते, तेव्हा तो स्क्रिप्टचा भाग नव्हता. पण, किसिंग सीनवर मला आक्षेप होता.’ पद्मिनी कोल्हापुरे पुढे म्हणाल्या, ‘मला राजीवशी काहीच घेणं-देणं नव्हतं, मला किसिंग सीन करणेच मुळात  पसंत नव्हते. पण मंदाकिनीने 45 दिवस शूट केले असतानाही, राजजींनी मला पुन्हा या भूमिकेसाठी विचारले होते.’

अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा प्रियंकचा विवाह नुकताच निर्माते करीम मोरानी यांची मुलगी शाजा मोरानीशी झाला आहे. अलीकडेच अनेक सेलेब्स त्यांच्या लग्नासाठी मालदीवमध्ये गेले होते. या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

(Why Actress Padmini Kolhapure rejects Ram Teri Ganga Maili film know the reasons)

हेही वाचा :

सलमान ते सारा, ‘देवमाणूस’ मालिकेतील मायराचे सुपरस्टार कनेक्शन, मिमीचार्वी खडसेचा अनोखा अंदाज

Video | ‘तेनु ले के मै जावांगा, दिल दे के मै जावांगा’,  होणाऱ्या बायकोसाठी नवऱ्याचा अफलातून डान्स, पाहा व्हिडीओ…

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.