AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar 2: अख्खं जग ‘धुरंधर 2’चं कौतुक करतंय, मग दीपिका पादुकोण गप्प का? रणवीरच्या चित्रपटाबद्दल एकही पोस्ट का नाही?

'धुरंधर' आणि 'धुरंधर: द रिव्हेंज' या दोन्ही चित्रपटांबद्दल रणवीर सिंहची पत्नी आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणने अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. सोशल मीडियावरही तिने या चित्रपटांच्या यशाबद्दल कोणत्याच शुभेच्छा दिलेल्या नाहीत.

Dhurandhar 2: अख्खं जग 'धुरंधर 2'चं कौतुक करतंय, मग दीपिका पादुकोण गप्प का? रणवीरच्या चित्रपटाबद्दल एकही पोस्ट का नाही?
Ranveer Singh and Deepika Padukone Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 27, 2026 | 9:44 AM
Share

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. याआधी डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या पहिल्या भागाने जबरदस्त कामगिरी केली होती. जगभरात या चित्रपटाने 1300 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर आता रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या ‘धुरंधर 2’ने अवघ्या सात दिवसांत जगभरात 1000 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. सोशल मीडियावर प्रेक्षक या चित्रपटाचं कौतुक करतच आहेत, त्याचसोबत बॉलिवूड इंडस्ट्रीपासून टॉलिवूडपर्यंत अनेक कलाकार या चित्रपटाची प्रशंसा करणारे पोस्ट लिहित आहेत. रजनीकांत, अल्लू अर्जुन, महेश बाबू, अनुपम खेर, कंगना राणौत, विजय देवरकोंडा, ज्युनिअर एनटीआर यांसारख्या सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर ‘धुरंधर 2’साठी खास पोस्ट लिहित रणवीर आणि टीमची पाठ थोपटली आहे. पण या सर्वांत नेटकऱ्यांचा एकच सवाल आहे की, रणवीरची पत्नी दीपिका पादुकोण याबद्दल गप्प का आहे?

‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हे दोन्ही चित्रपट रणवीरच्या करिअरमधील सर्वांत मोठे चित्रपट ठरले आहेत. रणवीरला याआधी एवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळालं नव्हतं. जरी तो बॉलिवूडमधल्या यशस्वी अभिनेत्यांपैकी एक असला तरी हमजा आणि जसकीरत सिंह रंगीच्या भूमिकांनी त्याला आता वेगळ्या पातळीवर नेऊन पोहोचवलं आहे. प्रिती झिंटा, आलिया भट्ट, कार्तिक आर्यन, शनाया कपूर, अनन्या पांडे, सिद्धार्थ मल्होत्रा यांसारख्या काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर रणवीरचं कौतुक केलं. परंतु दीपिकाने मात्र तिच्या सोशल मीडियावर ‘धुरंधर 2’साठी कोणतीच पोस्ट लिहिली नाही. असं करणारी फक्त दीपिकाच नाही, तर अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान यांसारखे सेलिब्रिटीसुद्धा आहेत.

जिथे एस. एस. राजामौली, रजनीकांत, नागार्जुन यांसारखे दिग्गज दाक्षिणात्य कलाकार या चित्रपटाचं कौतुक उघडपणे करू शकतात, तिथे बॉलिवूड इंडस्ट्रीतील मोठे कलाकार मौन बाळगून का आहेत, असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. यावरून सोशल मीडियावर विविध मतं व्यक्त केली जात आहेत. ‘धुरंधर’ चित्रपट प्रचारकी/ प्रोपेगेंडा असल्याची टीका काही लोकांकडून केली जात आहे. त्यामुळे अशा चित्रपटाचं उघडपणे कौतुक करणं, दीपिकाच्या मतांविरोधात असावं, असाही अंदाज काही नेटकऱ्यांनी व्यक्त केला आहे. असं असलं तरी ‘धुरंधर 2’च्या यशादरम्यान रणवीर आणि दीपिका मुंबईतल्या नुकत्याच एका रेस्टॉरंटमध्ये लंच डेटला गेल्याचं पहायला मिळालं.

Follow Us
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच