AR Rahman Birthday | ऑस्कर विजेत्या संगीतकाराच्या धर्मांतराची गोष्ट

आपल्या धर्मांतराची गोष्ट सांगताना रहमान सांगतो की, त्याला आपलं दिलीप हे नाव आवडत नव्हतं.

AR Rahman Birthday | ऑस्कर विजेत्या संगीतकाराच्या धर्मांतराची गोष्ट
Follow us
| Updated on: Jan 06, 2021 | 8:42 AM

मुंबई: सुप्रसिद्ध संगितकार ए.आर रहमान यांचा आज वाढदिवस आहे. रहमान यांचा जन्म 6 जानेवारी 1966 मध्ये तामिळनाडू येथील एका सांगितीक कुटुंबात झाला. ए.आर रहमानचं मूळ नाव ए. एस. दिलीप कुमार असून रहमानचं हे मूळ नाव अनेकांना माहीतही नसेल. मग दिलीप कुमारचा रहमान कसा झाला? असा प्रश्न अनेकांना पडतो. रहमानच्या वाढदिवसानिमित्ती या प्रश्नाचं उत्तर आपण पाहणार आहोत. (Why did the musician AR Rahman convert from Hinduism to Islam?)

संगीतकार ए. आर. रहमानच्या आईचं नुकतच निधन झालं आहे. रहमान आपल्या आईचा लाडका आणि त्यांच्या खूप जवळ होता. रहमान आणि त्याच्या आईने आयुष्याच्या एका महत्वाच्या टप्प्यावर हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारला होता. आपल्या धर्मांतराची गोष्ट सांगताना रहमान सांगतो की, त्याला आपलं दिलीप हे नाव आवडत नव्हतं. ‘AR Rahman The Spirit of Music’ या पुस्तकानुसार रहमानला आपलं नाव आपल्या इमेजनुसार नसल्याचं वाटत होतं. इस्लाममधील सुफी विचारांकडे वाढता कल पाहत आपलं नाव बदलण्याचा विचार त्याचा डोक्यात सतत डोकावत होता.

रहमानने एक ठिकाणी सांगितलं होतं की त्याची आई आपल्या छोट्या बहिणीचं लग्न करु इच्छित होती आणि त्यासाठी ती ज्योतिष्याकडे गेली होती. या दरम्यानच रहमान आपलं नाव आणि आपली ओळख बदलू इच्छित होता. तेव्हा ज्योतिषांनीही ही चांगली गोष्ट असल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर त्याच्यासमोर दोन नावंही ठेवली, एक म्हणजे अब्दुल रहमान आणि अब्दुल रहीम. या दोन्हीमधील एक नाव त्याच्यासाठी पुरक आणि चांगलं ठरेल असं ज्योतिषाचं म्हणणं होतं. त्यावेळी आपण रहमान हे नाव निवडल्याचं तो सांगतो. तसंच त्याच्या आईने नावासमोर अल्लाह रक्खा जोडण्यास सांगितलं. तेव्हा पासून तो अल्लाहरक्खा रहमान म्हणजेच एआर रहमान झाला.

धर्मांतरासाठी कुठला दबाव होता?

रहमानवर धर्मांतरासाठी कुणी दबाव टाकला होता का? या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी सांगितलं की, असं तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तुमचा अंतरात्मा तुम्हाला आवाज देतो. आपली आई हिंदू होती. ती अध्यात्मिक आणि देवावर नितांत श्रद्धा ठेवणारी होती. त्यावेळी आपल्या घरात हिंदू देव-देवतांचे फोटो, मूर्ती असत. त्याचबरोबर मदर मेरी आणि जीससचेही फोटो घरात होते. आमच्या घरी भीतींवर मक्का आणि मदीनाचेही फोटो होते, असं रहमान सांगतो.

‘एक कादरी आईला मुलीसमान मानायचे’

1986 मध्ये वडिलांच्या निधनाच्या 10 वर्षानंतर आपण एका कादरीला भेटल्याचं रहमान सांगतो. त्यावेळी तो कादरी खूप आजारी होता आणि माझ्या आईने त्याची खूप सेवा केली. तो कादरी माझ्या आईला मुलीसमान मानायचा. तेव्हा तो कादरी आणि आपल्यात एक नातं तयार झाल्याचंही रहमान सांगतो. तेव्हा रहमान 19 वर्षाचा होता आणि संगीता श्रेत्रात काम करण्यास त्याने सुरुवात केली होती.

इतर बातम्या:

Birthday Special : मराठमोळ्या आशाताईंनी रहमानला विश्वासार्हता दिली? वाचा तनहा तनहाची अजरामर गोष्ट

दिशा आणि टायगर खरंच रिलेशनशिपमध्ये? अनिल कपूरचं सूचक विधान

Why did the musician AR Rahman convert from Hinduism to Islam?

Non Stop LIVE Update
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?.