‘तुम्ही मला का जन्म दिला?’ अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या वडिलांना रागात विचारला होता जाब
अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती' च्या सेटवर त्यांच्या वडिलांसोबतचा एक अविस्मरणीय किस्सा सांगितला. करिअरच्या सुरुवातीला निराश होऊन त्या परिस्थितीचा सगळा राग अमिताभ यांनी त्यांच्या वडिलांवर काढला. जन्माला का घातलं असा प्रश्न विचारत त्यांनी वडिलांनाच दोषी मानलं. पण त्यावर त्यांचे वडील तथा लेखक हरिवंश राय बच्चन यांनी रागावण्याऐवजी ज्या पद्धतीने उत्तर दिलं ते खरोखरंच कौतुकास्पद आहे.

अमिताभ बच्चन आणि त्यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांच्यात कसं नातं होतं हे सर्वांनाच माहित आहे. कारण अनेकदा अमिताभ बच्चन त्यांच्या वडिलांबद्दल बोलताना दिसतात. तसेच त्यांच्या कविता सादर करताना दिसतात. आदरयुक्त आणि अद्वितीय नाते होते. अमिताभ वडिलांबद्दल सांगताना ते किती कडक आणि शिस्तप्रिय होते हे सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे प्रेमही तितकेच होते. अमिताभ त्यांना “बाबूजी” म्हणत असत आणि त्यांच्या प्रत्येक शब्दाला अंतिम मानत असत. “कौन बनेगा करोडपती” च्या सेटवर, अमिताभ बच्चन यांनी अलीकडेच त्यांच्या वडिलांबद्दलचा एक जुना किस्सा सांगितला ज्यामुळे सर्वांनाच तो किस्सा ऐकून गंमत वाटली शिवाय पुन्हा एकदा हरिवंश राय बच्चन यांना सगळे हे खरंच आदर्श होते . मेगास्टारने उघड केले की त्यांनी त्यांच्या आयुष्यात फक्त एकदाच त्यांचे वडील, महान कवी हरिवंश राय बच्चन यांना आवाज दिला आणि विचारले, “तुम्ही मला का निर्माण केले?”
वडिलांवर सगळा राग काढला
“कौन बनेगा करोडपती” च्या सेटवर, आमिर खान जेव्हा आला होता तेव्हा त्याच्यासमोर अमिताभ यांनी हा किस्सा सांगितला होता. अमिताभ यांनी स्पष्ट केले की ते कॉलेजचे पहिले दिवस होते. बोर्डिंग स्कूलचे फारच स्ट्रीक्ट जीवन होते. त्यानंतर जेव्हा त्यांना स्वातंत्र्य मिळालं तेव्हा त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं तेव्हा त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. करिअरमध्ये काही जम बसत नव्हता तेव्हा त्यांनी एकदा त्या परिस्थितीचा राग त्यांच्या वडिलांवर काढला होता. एका संध्याकाळी घरी ते रागाने घरी आले आणि त्यांनी रागाने त्यांच्या वडिलांना एक प्रश्न विचारला. तो म्हणजे “तुम्ही मला जन्माला का घातलं?” असं म्हणून ते निघून गेले.
हरिवंश राय बच्चन त्या क्षणी काहीही बोलले नाही पण…
अमिताभ बच्चन म्हणाले की, हा प्रश्न ऐकल्यानंतर, वडील हरिवंश राय बच्चन त्या क्षणी काहीही बोलले नाही , त्यांना ना राग आला, ना ते ओरडले, ते पूर्णपणे गप्प राहिले आणि नेहमीप्रमाणे पहाटे 4 ते 5 वाजता. ते त्यांच्या रोजच्या वेळी चालायला निघाले. त्या दिवशी सकाळी अमिताभ उठले तेव्हा त्यांना त्यांच्या उशीखाली एक कागद होता. त्यांच्या वडिलांनी त्यावर एक संपूर्ण कविता लिहिली होती. कवितेचे शीर्षक “नई लीख” होते.
View this post on Instagram
कविता लिहून प्रतिसाद दिला
बिग बी यांनी कवितेतील एक कडवंही वाचून दाखवलं. ‘जिंदगी और जमाने की कशमकश से घबराकर, मेरे लड़के मुझसे पूछते हैं, हमें पैदा क्यों किया था? तुम ही नई लीख धरना, अपने बेटों से पूछकर उन्हें पैदा करना.’ या कवितेवरून अमिताभ बच्चन यांना त्यांचं उत्तर मिळालं होतं असं ते म्हणाले.
2008 मध्ये बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये याचा उल्लेख केला होता.
अमिताभ बच्चन यांनी जून 2008 च्या त्यांच्या ब्लॉग पोस्टमध्ये या घटनेमागील भावनांबद्दल लिहिले होते. अमिताभ बच्चन यांनी जून 2008 च्या त्यांच्या ब्लॉग पोस्टमध्येही या घटनेचा उल्लेख केला होता. हा किस्सा सांगत त्यांनी लिहिले होते की ” त्या काळी तुमचे वय वाढत असताना तुम्हाला काय करायचे ते सांगितले जायचे; आता काय करायला हवं हे तुम्ही सांगायला सुरुवात करता. जवळजवळ एका रात्रीत, तुमच्या आदर्शवादी घोषणांनी, तुम्ही जगाचे आणि मानवतेचे तारणहार बनता.” दरम्यान अमिताभ यांचे वडील तथा लेखक हरिवंश राय बच्चन यांचे 18 जानेवारी 2003 रोजी वयाच्या 95 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले.
