‘या’ कारणामुळे ‘हेरा फेरी ३’मधून कार्तिक आर्यन बाहेर; परेश रावल यांचा मोठा खुलासा
लवकरच 'हेरा फेरी ३' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटासाठी कार्तिक आर्यनला साइन करण्यात आले होते. पण अचानक आता त्याला काढल्याचे समोर आले आहे.

‘हेरा फेरी’ आणि ‘फिर हेरा फेरी’ हे बॉलिवूडमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील सिनेमे आहेत. या चित्रपटांमध्ये अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल हे कलाकार दिसले. त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता लवकरच ‘हेरा फेरी ३’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात परेश रावल यांच्यासोबत अभिनेता कार्तिक आर्यन देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे समोर आले होते. मात्र आता कार्तिकला सिनेमामधून काढण्यात आले आहे. स्वत: परेश रावल यांनी याबाबत खुलासा केला आहे.
परेश रावल यांनी नुकताच सिद्धार्थ कन्ननला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी चित्रपटाशी संबंधीत अनेक विषयांवर वक्तव्य केले. त्यांना हेरा फेरी ३ चित्रपटाची स्क्रीप्ट कशी आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत परेश रावल म्हणाले की, ‘मी नीरज वोहराला (दिग्दर्शकाला) म्हणायचो, तुम्ही त्यात सीन्स भरता आहात, त्याची गरज नाही. पहिल्या चित्रपटात जो साधेपणा होता तो जपण्यास मी त्याला सांगितले. जर तुम्ही चित्रपट ओव्हरफिल केला तर तो गोंधळलेला वाटेल. लोक कशावरही हसतील, कोणी नग्न धावत असेल तर ते हसतील पण आपल्याला नागडे दाखवण्याची गरज नाही. तुम्हाला काय दाखवावे आणि काय दाखवू नये याची जाणीव असायला हवी.’
या मुलाखतीमध्ये पुढे बाबुराव या त्यांच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना परेश रावल म्हणाले, ‘मुन्ना भाई एमबीबीएसचा ‘लगे रहो मुन्ना भाई’च्या सिक्वेलसाठी मी खूश आहे. ही एक मोठी झेप आहे. जर तुम्ही असा सिक्वेल बनवलात तर मी तुम्हाला सलाम करतो. पण जर तुम्ही पैसे कमावण्यासाठी सिक्वेल बनवत असाल तर त्यात काही मजा नाही. तुमच्याकडे बाबूरावांसारखे पात्र आहे. ज्याची ५०० कोटींची प्रतिष्ठा आहे. तुम्ही ते पात्र दुसऱ्यामध्ये कसे दाखवू शकता? तुम्ही पूर्ण विनोद बदलले तर काय फायदा?’
या मुलाखतीमध्ये परेश रावल हेरा फेरी 3 च्या कास्टिंगबद्दल देखील बोलले आहेत. परेश रावल म्हणाले, ‘कार्तिकला या चित्रपटासाठी साइन केले होते. त्यावेळी चित्रपटाची कथा वेगळी होती. राजूने त्याला पकडून आणले होते, पण हे वेगळे पात्र होते. मला एवढेच माहीत आहे. राजूच्या भूमिकेत कार्तिकला कास्ट करण्यात आलेले नाही. अक्षय या चित्रपटात काम करणार होता.’
