गाणं ऐकून रेल्वेचा अधिकारी म्हणाला, ‘बेटा, रेल मे नोकरी करोगी?’; वाचा, गायिका निशा भगत यांचा किस्सा

प्रसिद्ध गायिका निशा भगत यांनी अनेक उषा मंगेशकरांपासून ते सुरेश वाडकर आणि आनंद शिंदेंपर्यंत अनेक बड्या गायकांसोबत गाणी गायली. (why nisha bhagat refused railways offer?, read story)

गाणं ऐकून रेल्वेचा अधिकारी म्हणाला, 'बेटा, रेल मे नोकरी करोगी?'; वाचा, गायिका निशा भगत यांचा किस्सा
nisha bhagat
भीमराव गवळी

|

Apr 24, 2021 | 3:39 PM

मुंबई: प्रसिद्ध गायिका निशा भगत यांनी अनेक उषा मंगेशकरांपासून ते सुरेश वाडकर आणि आनंद शिंदेंपर्यंत अनेक बड्या गायकांसोबत गाणी गायली. सिनेमातही गाणी गायली. कव्वालीचे सामने केले. गायनपार्ट्या केल्या. यावेळी त्यांना काही चांगले तर काही वाईट अनुभव आले. काय होते हे अनुभव? ऐका निशाताईंच्याच शब्दात. (why nisha bhagat refused railways offer?, read story)

नोकरीची ऑफर नाकारली

निशा भगत या 19 वर्षाच्या असतानाचा हा किस्सा आहे. माटुंगा वर्कशॉपमध्ये भीम जयंतीचा कार्यक्रम होता. पण कार्यक्रम केवळ दोन तासांचाच होता. रेल्वेची तशी अटच होती. हा कार्यक्रम ऐकण्यासाठी रेल्वेचे बडे अधिकारीही आले होते. कार्यक्रम चांगलाच रंगला. परप्रांतिय असलेल्या रेल्वेच्या एका बड्या अधिकाऱ्याला हा कार्यक्रम तर आवडलाच. शिवाय त्याने कार्यक्र्माची वेळ एका तासाने वाढवली. कार्यक्रम संपल्यावर हा अधिकारी निशाताईंकडे आला आणि बेटा, रेल में नोकरी करोगी, असं सांगत चक्क नोकरीची ऑफर दिली. मात्र, अचानक आलेल्या या ऑफरमुळे निशाताई गोंधळून गेल्या. कोणताही सारासार विचार न करता त्यांनी ही ऑफर नाकारली.

अंगठी गहाण ठेवून भाडं भरलं

निशाताईंना अनेक वाईट अनुभवांनाही सामोरे जावं लागलं. ‘हॅलो, मी बाबुराव बोलतोय’ या गाण्याच्या कार्यक्रमाच्या प्रयोगा निमित्ताने त्या सटाणा, नाशिक, सिन्नर आणि मनमाडलाही गेल्या होत्या. एका व्यक्तिने त्यांचे हे पाच प्रयोग लावले होते. बिदागीचंही ठरलं. त्यानुसार निशाताई कलावंतांना घेऊन मनमाडला एका हॉटेलमध्ये उतरल्या होत्या. मात्र, आयोजकाने त्यांची दिवसभर खबरच घेतली नाही. तो फक्त कार्यक्रमापुरतंच यायचा. बिदागीही देत नव्हता. त्यामुळे निशाताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिवसभर उपाशी रहावं लागलं. आयोजकाच्या भरवश्यावर असल्याने त्यांनी सोबत कमी पैसे आणले होते. परंतु, आयोजक केवळ आश्वासनच देत असल्यामुळे त्यांना हातातील अंगठी गहाण ठेवून हॉटेलचं भाडं भरावं लागलं. यावेळी मंत्रालय वार्ताचे संपादक अनिल अहिरे त्यांच्या मदतीला धावून आल्याने त्यांना मुंबईला सुखरूप येता आले.

दक्षिण आफ्रिका, मॉरिशसही गाजवलं

निशाताईंचे सर्वाधिक कार्यक्रम खान्देश, कोकण आणि पुण्या-मुंबईत झाले आहेत. पण त्यांनी देशाच्या सीमाओलांडूनही गाण्याचे कार्यक्रम केले आहेत. त्यांनी मॉरिशस, दक्षिण आफ्रिका, इस्रायल, कैरो आणि सिंगापूरमध्ये जुन्याकाळातील प्रसिद्ध गायक कृष्णा शिंदे यांच्यासोबत कार्यक्रम केले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांचे कव्वालीचे सर्वाधिक सामनेही परदेशात झाले आहेत. प्रसिद्ध आंबेडकरी गीतकार राजानंद गडपायले हे त्यांचे मुख्य कवी होते. गडपायले यांची त्यांनी सर्वाधिक गाणी गायली आहेत. त्यामागे दोन कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे निशाताईंच्या आई-वडिलांनीही गडपायले यांची गीते गायली आहेत. दुसरं कारण म्हणजे गडपायले हे विदर्भातीलच आहेत. त्याशिवाय त्यांनी अनेक नामवंत गीतकरांची गाणी गायली आहेत. सुषमादेवी, परबीन साबा, अस्लम साबरी, सुरेश वाडकर, सुविंदर सिंग, आशालता भगत, लता मंगेशकर आणि आशा भोसले यांची गाणी ऐकायला त्यांना आवडतात. तर, उषा मंगेशकर, सुरेश वाडकर, विनोद राठोड, सुदेश भोसले. उत्तरा केळकर, अनुपमा देशपांडे, वैशाली सामंत, शकुंतला जाधव, महेंद्र कपूर, मोहम्मद अजीज, ज्योत्सना हार्डिकर, प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, विठ्ठल उमप. सरफर्राज सुल्तानी, जी. अन्सारी, अशालता भगत, उषा भगत आणि राजू भगत यांच्यासोबत त्यांनी पार्श्वगायन केलं आहे. (साभार, आंबेडकरी कलावंत) (why nisha bhagat refused railways offer?, read story)

संबंधित बातम्या:

दिवसा शाळा, रात्री गायनपार्ट्या, लतादीदींनीही कौतुक केलेली ही गायिका माहीत आहे का?

‘बाबासाहेब जिंदाबाद’साठी पत्नीने अंगावरचे दागिने मोडले; वाचा, शाहीर कुंदन कांबळेंचा किस्सा

‘तुझा खर्च लागला वाढू, सांग कितीदा कर्ज काढू…’ हे गाणं तुम्ही आजही गुणगुणता; कुणी लिहिलंय माहित्ये?

(why nisha bhagat refused railways offer?, read story)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें