AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

National Film Awards: राणी मुखर्जीला जास्त रोख रक्कम तर शाहरुख खानला कमी… यंदाच्या राष्ट्रीय पुरस्करामध्ये असे का झाले?

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांना नेमकं काय मिळतं? असा प्रश्न अनेकांना पडतो. चला जाणून घेऊया शाहरुख खान, राणी मुखर्जी, विक्रांत मेसी यांना राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर काय मिळाले आहे. असेही म्हटले जात आहे की शाहरुख खानला मिळालेली रक्कम ही राणी मुखर्जी पेक्षा कमी आहे. नेमकं कारण काय जाणून घ्या...

National Film Awards: राणी मुखर्जीला जास्त रोख रक्कम तर शाहरुख खानला कमी... यंदाच्या राष्ट्रीय पुरस्करामध्ये असे का झाले?
National AwardsImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Sep 23, 2025 | 6:24 PM
Share

आज, 23 सप्टेंबर रोजी देशाची राजधानी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा आणि राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. पुरस्कारासोबतच त्यांना रोख बक्षीसही मिळाले. पण तुम्हाला माहिती आहे का की शाहरुखला राणीपेक्षा कमी रोख बक्षीस मिळाले आहे? यामागचे कारण चला जाणून घेऊया…

शाहरुख खानला त्याच्या कारकीर्दीतील पहिला नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. 2023मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जवान’ चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. टाइम्स ऑफ इंडियाच्या मते, सर्वोत्कृष्ट अभिनेता श्रेणीत नॅशनल अवॉर्ड जिंकणाऱ्याला 2 लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाते. पण जर या श्रेणीत दोन विजेते असतील, तर ही बक्षीस रक्कम अर्धी वाटली जाते.

शाहरुखला किती रक्कम मिळाली?

शाहरुख खानसोबतच विक्रांत मेसीला ‘12th फेल’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे रोख बक्षीस दोन भागांमध्ये वाटले गेले आणि शाहरुख खान आणि विक्रांत यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस मिळाले.

वाचा: अंकिता वालावलकरने सांगितलं सूरज चव्हाणच्या लग्नाचं सत्य, नेमकं काय म्हणाली?

राणी मुखर्जीला किती रक्कम मिळाली?

राणी मुखर्जीला ‘मिसेज चटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ चित्रपटासाठी पहिला नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळाला. प्रसारण मंत्रालयाच्या मते, अभिनेत्रींना नॅशनल अवॉर्डासोबत 3 लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जात आहे. राणी मुखर्जी या श्रेणीत एकमेव विजेती असल्यामुळे तिला पुरस्कारासोबत तीन लाख रुपयांचे रोख बक्षीसही मिळाले आहे.

नॅशनल फिल्म अवॉर्ड्स आणि काय-काय मिळते?

-राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांना पुरस्कार आणि रोख बक्षीसाव्यतिरिक्तही बरेच काही मिळते.

-सुवर्ण कमळ – हे पुरस्कार त्या श्रेणींमध्ये एकमेव विजेत्यांना दिले जातात. सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट अशा श्रेणींमध्ये विजेत्यांना 3 लाख रुपयांचे रोख बक्षीसही दिले जाते.

-रजत कमळ – जर एखाद्या श्रेणीत एकापेक्षा जास्त विजेते असतील, तर त्यांना रजत कमळ दिले जाते. सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता/अभिनेत्री यासारख्या श्रेणींमध्ये विजेत्यांना 2 लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाते. तसेच, एकापेक्षा जास्त विजेते असल्यास ही रक्कम त्यांच्यात वाटली जाते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...