आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात शाहरुख गप्पा का राहिला? आता मित्रानेच केला खुलासा

केवळ चित्रपटामुळेच नाही तर शाहरुख नेहमीच त्याच्या विनम्र स्वभावामुळेही ओळखला जातो. मन्नत बाहेर जमलेली चाहत्यांची गर्दी असो किंवा मग पापाराझी.. शाहरुख नेहमीच त्यांच्याशी प्रेमळपणे वागताना दिसतो. 

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात शाहरुख गप्पा का राहिला? आता मित्रानेच केला खुलासा
Shah Rukh Khan Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 16, 2023 | 1:27 PM

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान जवळपास दीड वर्षापूर्वी ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत आला होता. मुंबई एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखाली 2 ऑक्टोबर 2021 रोजी कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकण्यात आला होता. या क्रूझवर ड्रग्ज पार्टी सुरू असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार एनसीबीने ही कारवाई केली होती. या कारवाईदरम्यान आर्यन खान, त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मैत्रीण मुनमुन दामेचा या तिघांसह एकूण आठ जणांना ताब्यात घेतलं होतं. या कारवाईनंतर आर्यन जवळपास वीस दिवसांहून अधिक दिवस तुरुंगात होता. या संपूर्ण घडामोडींदरम्यान शाहरुखने कोणतीच प्रतिक्रिया माध्यमांना दिली नव्हती. अत्यंत शांतपणे त्याने हे प्रकरण हाताळलं होतं. मुलासोबत हे सर्व घडत असताना शाहरुखने मौन का बाळगलं होतं, याबाबतचा खुलासा आता त्याच्या एका मित्राने केला आहे.

आर्यन खानच्या खटल्यादरम्यान लोकांना वाटलं होतं की शाहरुख त्याच्या मुलाचा बचाव करण्यासाठी बेधडकपणे माध्यमांसमोर येईल आणि व्यक्त होईल. पण असं काहीच झालं नव्हतं. समोर येऊन स्पष्टीकरण देण्यापेक्षा मागेच उभं राहणं योग्य समजून त्याने आर्यनला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. शाहरुखसोबतच त्याची पत्नी गौरी आणि मुलगी सुहानासुद्धा माध्यमांपासून दूर राहिली. आर्यन तुरुंगातून बाहेर निघाल्यानंतरही त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.

शाहरुख खानचा सर्वांत जुना मित्र, अभिनेता आणि दिग्दर्सक विवेक वासवानीने यामागचं कारण सांगितलं. “मला वाटतं की त्याला या मुद्द्याला वाढवायचं नव्हतं. शाहरुखने त्याचं तोंड उघडलं नाही, ना आर्यनने, गौरीने किंवा सुहानाने. त्यांनी सन्मानपूर्वक या गोष्टीला हाताळलं.” ड्रग्ज प्रकरणात जवळपास 22 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर आर्यनला जामिन मिळाला. त्यानंतर गेल्या वर्षी त्याला एनसीबीकडून क्लिन चिट मिळाली.

हे सुद्धा वाचा

शाहरुखच्या ‘पठाण’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने देशभरात 500 कोटी रुपयांची कमाई केली आहे. केवळ चित्रपटामुळेच नाही तर शाहरुख नेहमीच त्याच्या विनम्र स्वभावामुळेही ओळखला जातो. मन्नत बाहेर जमलेली चाहत्यांची गर्दी असो किंवा मग पापाराझी.. शाहरुख नेहमीच त्यांच्याशी प्रेमळपणे वागताना दिसतो.

आर्यनने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत त्याच्या नव्या प्रोजेक्टची माहिती दिली होती. ‘लेखनाचं काम पूर्ण झालं, आता ॲक्शन म्हणण्यासाठी उत्सुक आहे’, असं कॅप्शन आर्यनने या फोटोला दिलं होतं. मात्र त्याच्या या चित्रपटात कोणते कलाकार असणार याबद्दलची माहिती अद्याप समोर आली नाही.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.