विसाव्या शतकातील बहुचर्चीत ‘सव्यसाची’ आता ऑडिओबुकमध्ये! अभिनेत्री सीमा देशमुखांच्या आवाजात होणार रेकॉर्ड!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: अनिश बेंद्रे

Updated on: Jun 17, 2021 | 7:35 AM

आजच्या आधुनिक काळातील आघाडीचे प्रतिभावंत लेखक संजय सोनवणी (Sanjay sonawani) यांची विसाव्या शतकातील अखेरच्या दशकात भारताने काय काय अनुभवले याचे यथार्थ दर्शन घडवणारी ‘सव्यसाची’ ही बहुचर्चीत सामाजिक कादंबरी ‘स्टोरीटेल मराठी’ने (storytel) नव्या ऑडिओबुकमध्ये खास साहित्यरसिक श्रोत्यांसाठी आणली आहे.

विसाव्या शतकातील बहुचर्चीत ‘सव्यसाची’ आता ऑडिओबुकमध्ये! अभिनेत्री सीमा देशमुखांच्या आवाजात होणार रेकॉर्ड!
सव्यसाची

मुंबई : आजच्या आधुनिक काळातील आघाडीचे प्रतिभावंत लेखक संजय सोनवणी (Sanjay sonawani) यांची विसाव्या शतकातील अखेरच्या दशकात भारताने काय काय अनुभवले याचे यथार्थ दर्शन घडवणारी ‘सव्यसाची’ ही बहुचर्चीत सामाजिक कादंबरी ‘स्टोरीटेल मराठी’ने (storytel) नव्या ऑडिओबुकमध्ये खास साहित्यरसिक श्रोत्यांसाठी आणली आहे. त्या काळातल्या वास्तवावर आधारित कल्पनांचा सुरेख अनुभव या कादंबरीमध्ये आला असून, माफिया टोळ्यांमुळे निर्माण झालेल्या या काळातील वर्तमानातल्या सामाजिक जीवनाचे चित्र नाट्यात्मक व गतिमानतेने अचूक साधले गेल्याने ‘स्टोरीटेल’च्या या ऑडिओबुकमध्ये अभेनेत्री सीमा देशमुख यांच्या स्पष्ट आवाजात ऐकताना श्रोते तल्लीन होतात (Writer Sanjay sonawani book Savyasachi recorded in seema deshmukh voice available on storytel).

‘सव्यासाची’ या कादंबरीत विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकाने नेमके काय काय भोगले याची गाथा कथन करण्यात आली आहे. नवी अर्थव्यवस्था आणि त्या अनुषंगाने ढवळली गेलेली जुनी व्यवस्था आणि मूल्ये राजकारणाचा झालेला अध:पात आणि गुन्हेगारीकरण, धार्मिक तेढ वाढवत त्याचा धंदा करणारे दलाल आणि यासोबत असहाय्यपणे या नव्या वातावरणाशी जुळवत, नवी स्वप्ने पहात फरफटत जाणारा संभ्रमित समाज याचे विराट दर्शन या महाकाय कादंबरीत घडते.

विसाव्या शतकाचा वर्तमानातील आरसा

सर्वव्यापकता एवढेच काही या कादंबरीचे वैशिष्ट्ये नाही. या परिवर्तनाच्या काळात सामील झालेल्या सर्वच भल्याबुऱ्या पात्रांचे, त्यांच्या जीवनाचे आणि घटनांचे चित्रण अत्यंत सहृदयतेने लेखक संजय सोनवणी यांनी केल्याने ती स्टोरीटेलवर ऑडिओबुकमध्ये ऐकताना साहित्यरसिक श्रोते दंग होतात. एकाच प्रवाहात कोमलता, कारुण्य आणि नृशंसता यांचा मिलाफ साधताना सर्वच घटनांची सर्वांगीण मिमांसाही केली असल्याने तटस्थ सहृदयतेचेही दर्शन घडवण्याची किमया या कादंबरीत लेखकाने साधली गेली आहे. ‘सव्यसाची’च्या रुपात विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकातील वर्तमानाचा आरसा दाखवला गेला आहे.

कोण आहेत संजय सोनवणी?

‘सव्यसाची’ ही प्रसिद्ध सामाजिक कादंबरी लिहिणारे प्रख्यात लेखक संजय सोनवणी हे मराठी साहित्यविश्वातील आधुनिक काळातले महत्त्वाचे साहित्यिक, तत्वज्ञ, कवी आणि संशोधक आहेत. त्यांनी मानवी जीवनाच्या असंख्य पैलूंना विविध साहित्यप्रकाराद्वारे हात घालत विपुल साहित्य रचना केली आहे. वर्तमानातील सामाजिक प्रश्नांवर सडेतोड भूमिका घेण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांचं लेखन नैतिक समस्यांबद्दलचे तसेच आधुनिक परिप्रेक्षात वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेले चिंतनपर असून त्यांच्या बौद्धिक आणि तात्विक उंचीचा परिचय करून देते. त्यांच्या कादंबऱ्यांनी मराठी साहित्याला नवी परिमाणे मिळवून दिली आहेत.

मराठी साहित्यविश्वात इतिहास घडविणारी ही लोकप्रिय कादंबरी ऐकण्यासाठी आपल्याला ‘स्टोरीटेल’ डाउनलोड करावे लागेल. ‘स्टोरीटेल’द्वारे सर्व भारतीय भाषांमध्ये ऑडिओबुक्सची निर्मिती केली जात आहे आणि त्याला साहित्यप्रेमी वाचक श्रोत्या रसिकांचा अमाप प्रतिसाद मिळू लागला आहे. ‘स्टोरीटेल’वर ऑडिओबुक्स कुठेही, कितीही व कधीही ऐकता येतात.

(Writer Sanjay sonawani book Savyasachi recorded in seema deshmukh voice available on storytel)

हेही वाचा :

Video | ‘माझ्या गालावर पडते खळी, नाक माझं बाई चाफेकळी…’, श्रुती मराठेच्या अदा पाहून नेटकरी फिदा!

PHOTO | ‘ब्युटी इन ब्लॅक’, उर्मिला कोठारेच्या घायाळ करणाऱ्या अदांवर चाहतेही फिदा!

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI